Indonesia Open badminton 2022 : ‘एचएस प्रणॉय’ची उपांत्यपूर्व फेरीत धडक
Updated On:

जकार्ता – भारताचा स्टार खेळाडू एचएस प्रणॉय याने येथे सुरु असलेल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. प्रमुख खेळाडू अपयशी ठरत असताना प्रणॉयने केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद ठरली आहे.
त्याने उपउपांत्यपूर्व फेरीच्या पुरुष एकेरीच्या गुरुवारी झालेल्या लढतीत हॉंगकॉंगच्या एनजी का लॉंग अँगस याच्यावर 21-11, 21-18 असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. या फेरीत आता त्याची लढत डेन्मार्कच्या रासमुस गेमके व फ्रान्सच्या ब्रिस लेव्हरडेझ यांच्यातील विजेत्याशी होईल.





