Indonesia earthquake : इंडोनेशियाला 6.7 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
इंडोनेशियाच्या सुवेसी बेटाला मंगळवारी ६.७ मॅग्निट्युड क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाच्या मुख्य धक्क्याच्यापाठोपाठ अनेक आफ्टरशॉक देखील या भागाला जाणवले.

Indonesia earthquake – इंडोनेशियाच्या सुवेसी बेटाला मंगळवारी ६.७ मॅग्निट्युड क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाच्या मुख्य धक्क्याच्यापाठोपाठ अनेक आफ्टरशॉक देखील या भागाला जाणवले.
सेंट्रल सुलावेसी प्रांताची राजधानी असलेल्या पालू शहराला जाणवलेला भूकंपाचा पहिला धक्का जवळपास एक मिनिट इतक्या कालावधीचा होता. या भूकंपामुळे तुरळक ठिकाणी पडझडीच्या घटना झाल्या आहेत. (Indonesia earthquake)
जखमींना रुग्णालयात जागा मिळावी, यासाठी रुग्णालयांनी काही रुग्णांना तातडीने घरी पाठवून दिले. मात्र भूकंपामुळे जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त तातडीने उपलब्ध झाले नाही. (Indonesia earthquake)

Indonesia earthquake : इंडोनेशियाला 6.7 तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
भूकंपाचा केंद्रबिंदू पालू शहराच्या अग्नेयेला ४३ किलोमीटरवर भूगर्भात १० किलोमीटर खोलीवर होता, असे यूएस जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे. त्यापाठोपाठ ५.२ मॅग्निट्युड क्षमतेचे अनेक धक्के जाणवले. मात्र या भूकंपामुळे कोठेही त्सुनामी लाटांचा इशारा दिला गेला नाही.
पालू शहराला २०१८ मध्ये ७.५ मॅग्निट्युड क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्यामुळे ३ मीटर उंचीच्या त्सुनामी लाटाही उसळल्या होत्या. यामुळे तब्बल ४ हजार लोक मरण पावले होते.
तर भूस्खलनामुळे अनेक जण गाडले गेले होते. जानेवारी २०२१ मध्ये सुलावेसी बेटावरच्या मामुजू शहराला बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यात किमान १०० जण ठार झाले होते.





