Test Rankings 2024 (Bowling) : बुमराह पुन्हा अव्वलस्थानी विराजमान, आर. अश्विनच्या 8 वर्ष जुन्या विक्रमाशी केली बरोबरी…

ICC Test Bowling Rankings 2024 : – टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ताज्या आयसीसी क्रमवारीत इतिहास रचला आहे. बुमराहने आर अश्विनच्या 8 वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेत बुमराहची कामगिरी अतिशय उत्कृष्ट राहिली आहे. बुमराहने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये एकूण 21 विकेट घेतल्या आहेत.
India’s pace spearhead equals a massive feat after his incredible performance in the third #AUSvIND Test 👏
More on the latest ICC Men’s Rankings ⬇https://t.co/akPvStkguX
— ICC (@ICC) December 25, 2024
जसप्रीत बुमराहने आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत मोठे स्थान गाठले आहे. बुमराहने कारकिर्दीत प्रथमच 900 रेटिंग पॉइंटचा टप्पा ओलांडला आहे. बुमराह जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज आहे आणि त्याने आपले स्थान आणखी मजबूत केले आहे. भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. या क्रमवारीत जसप्रीत बुमराहला 904 रेटिंग मिळाली आहे.
अश्विनच्या 8 वर्ष जुन्या विक्रमाशी केली बरोबरी…
बुमराह हा भारताचा असा गोलंदाज ठरला आहे ज्याने संयुक्तपणे सर्वोच्च रेटिंग गुण मिळवले आहेत. त्याच्या आधी डिसेंबर 2016 मध्ये आर अश्विनने 904 रेटिंग पॉइंट्सह अव्वल स्थान मिळवले होते. दरम्यान, नुकतेच अश्विन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतली आहे.
Test Rankings 2024 : आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठी उलथापालथ, पंत अन् जयस्वालला बसला मोठा फटका…
सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेतील गाबा कसोटीत बुमराहने 94 धावांच्या मोबदल्यात 9 गडी बाद केले होते. यानंतर तो 904 कसोटी रेटिंग गुणांवर पोहोचला. बुमराहने या मालिकेत आतापर्यंत एकूण 21 बळी टिपले आहेत. या कामगिरीच्या जोरावरच त्याने दक्षिण आफ्रिकेच्या रबाडाला मागे सोडले आहे. दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा 856 रेटिंगसह तर जोश हेझलवूड 852 रेटिंगसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. भारताचा दुसरा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला एका स्थानाचा फायदा झाला असून तो आता 24व्या स्थानावर पोहोचला आहे.





