Women’s Junior Asia Cup 2024 (IND vs BAN): महिला ज्युनियर आशिया चषक 2024 च्या सामन्यात भारताने रविवारी बांगलादेशचा दारूण पराभव करत विजयी सलामी दिली आहे. भारताच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने हा सामना 13-1 असा जिंकला. या सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. भारताचा स्पर्धेतील पुढील सामना आज(9 डिसेंबर 2024,सोमवार) रात्री 8.30 वाजता होईल.
Full-Time Update
An electrifying performance by the Girls in Blue! 🔥
India secured a massive 13-1 victory over Bangladesh in their tournament opener at the Junior Women’s Asia Cup 2024! 💥 #HockeyIndia #IndiaKaGame #INDvBAN #WomensJuniorAsaiCup24
.
.
.@CMO_Odisha… pic.twitter.com/frVDx7SPCt— Hockey India (@TheHockeyIndia) December 8, 2024
महिला ज्युनियर हॉकी आशिया चषक स्पर्धेत भारताने बांगलादेशविरुद्ध दमदार सुरुवात केली होती. भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये आधीच 3-1 अशी आघाडी घेतली होती. टीम इंडियासाठी दीपिकाने पहिला गोल केला. बांगलादेशकडून एकमेव गोल अर्पिता पालने केला. टीम इंडियाने ही आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली आणि गोलचे अंतरही वाढते ठेवले. भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोन गोल केले.
पहिल्या आणि दुसऱ्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने चमकदार कामगिरी केली. यामध्ये एकूण तीन गोल झाले. या क्वार्टरमध्ये साक्षी राणा आणि मुमताज यांनी गोल केले. टीम इंडियाने चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली. भारताने शेवटच्या क्वार्टरमध्ये एकूण पाच गोल केले.
भारताकडून मुमताजने (27′,32′,53′,58′) सर्वाधिक गोल केले. तिने एकूण चार गोल केले. कनिकाने संघासाठी (12′,51,51′) असे 3 तर दीपिकानेही (7′,20′,55′) 3 गोल केले. मनीषा (10′), डंग डंग ब्युटी(33′) आणि साक्षी राणा (43′) यांनी प्रत्येकी एक गोल केला.