India’s Foreign Exchange Reserves: भारताच्या परकीय चलन साठ्यात 3.8 अब्ज डॉलरची वाढ; 700 अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडला
India's Foreign Exchange Reserves: 27 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा वाढून 728.4 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेला होता.

India’s Foreign Exchange Reserves: सरलेल्या आठवड्यामध्ये भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक बर्याच प्रमाणात वाढले. त्याचबरोबर रिझव्हर्र् बँकेने रुपयाचे मूल्य स्थिर करण्यासाठी केलेल्या उपाययोजनामुळे रुपयाचे मूल्य स्थिर होण्यास मदत झाली. अशा परिस्थितीत 10 एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा 3.8 अब्ज डॉलरने वाढून 700.9 अब्ज डॉलर या पातळीवर गेला.
या अगोदरच्या आठवड्यामध्ये परकीय चलन साठ्यात नऊ अब्ज डॉलरची वाढ झाली होती. मात्र त्या अगोदरच्या तीन आठवड्यामध्ये परकीय चलन साठ्यात अखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर रुपया घसरल्यामुळे बरीच घट झाली होती. 27 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा वाढून 728.4 अब्ज डॉलर या विक्रमी पातळीवर गेला होता. मात्र 28 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने इराणवर हल्ला केला. त्यानंतर जागतिक बाजारात खनिज तेलाचे दर 70 डॉलरवरून बराच काळ 120 अब्ज डॉलर झाले होते.
भारताला स्पॉट मार्केटमधून खनिज तेल खरेदी करण्यासाठी 120 अब्ज डॉलर प्रति पिंपापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागत होती. अशा परिस्थितीत परकीय चलन साठ्यावर दबाव आला होता. आता परिस्थिती वेगाने सुधारत असल्याचे दिसून येत आहे. आखाती युद्धामुळे सरलेल्या आठवड्यात सोन्याच्या मूल्यात बरीच वाढ झाली. रिझर्व्ह बँकेकडे असलेल्या 800 टन सोन्याचे मूल्य या कालावधीत 601 दशलक्ष डॉलरने वाढून 121.3 अब्ज डॉलर या पातळीवर गेले.
त्यामुळे परकीय चलन साठा वाढण्यास मदत झाली असल्याचे दिसून येते. सध्याच्या कठीण परिस्थितीतही भारताकडे पुरेसा परकीय चलन साठा असून हा साठा भारताला एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या आयातीसाठी पुरेस आहे. मात्र तरीही भारत परकीय चलन संवर्धनासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे या आघाडीवर चिंता करण्याची कसलीही गरज नाही असे समजले जाते.



