Sindoor Operation : भारताचा पाकिस्तानवर हल्ला, राज्यभरात फटाके फोडून जल्लोष

Sindoor Operation : भारतीय लष्करांकडून पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर मध्यरात्री एअरस्ट्राइक केले ऑपरेशन सिंदूर नावाखाली एअरस्ट्राइक करण्यात आला करण्यात आला ह्या बातम्या समाज माध्यमावर झळकल्यानंतर पहाटेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून भाजपा युवा मोर्चाच्या वतीने फटाके फोडून आपला आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे
या हवाई हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. या हल्यात 75 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे बोलले जात आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेत तब्बल नऊ ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले आहेत.
अकोल्यात फटाके फोडून जल्लोष
या अॅापरेशनचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तसेच दहशतवाद्यांवर भारताने केलेल्या हल्ल्यानंतर आता देशभरात जल्लोष साजरा होत आहे. अकोल्यातही अकोलेकरांनी जल्लोष केला आहे. अकोल्यातल्या अग्रेसन चौकात चौकातील विश्व हिंदू परिषद आणि अकोलेकरांनी फटाके फोडत जल्लोष केला आहे. तसेच भारताने केलेल्या हल्ल्याचा गर्व असल्याचे अकोलेकरांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
पालघरमध्ये पेढे वाटून आनंदोत्सव
पालघरच्या बोईसर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला, यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत भारतीय सैन्यदल आणि पंतप्रधान मोदींचा जयजयकर करत एकमेकांना पेढे भाराऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
खेड वासियांकडून जल्लोष
खेडवासीयांच्या वतीने फटाके फोडून आणि पेढे भरवून या हल्ल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. सरकारने पाकिस्तानला अशी अद्दल घडवावी की भारतावर वाकडी नजर करताना पुढचे 10 जन्म पाकिस्तानला विचार करावा लागेल. आम्ही सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी असल्याची भावना यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली.
पंढरपुरात पेढा वाटून आनंदोत्सव
ज्येष्ठ नागरिक व नागरिकांनी मॉर्निंग वॉक वेळी पेढे वाटून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी हिंदुस्तान जिंदाबाद… भारत माता की जय असा घोषणा देण्यात आला.
नागपूरमध्ये जल्लोष
भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूरचे राज्यभरात स्वागत केले जात आहे. नागपूरमध्ये नागरिकांनी एकत्र येत जल्लोष केला तसेच भारत जिंदाबादच्या घोषणाही दिल्या.





