Narendra Modi : सर्जीकल स्ट्राईक हे दहशतवाद्यांना दिलेले निर्णायक प्रत्युत्तर; नरेंद्र मोदींनी केले स्पष्ट
भारताचे दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स धोरण अवलंबत वाटचाल करत असून दहशतवादाचा सामना कठोरपणे आणि निर्णायकपणे केला जाईल, हे देशाने स्पष्ट केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सांगितले.

Narendra Modi : २०१६ मधील सर्जिकल स्ट्राईक हे दहशतवादी हल्ल्यांच्या वेदनेला भारताने दिलेले निर्णायक प्रत्युत्तर होते. त्यातून देशाच्या दहशतवादविरोधी धोरणाचे एक नवीन उदाहरण जगासमोर आले. आता भारताचे दहशतवादाबाबत झिरो टॉलरन्स धोरण अवलंबत वाटचाल करत असून दहशतवादाचा सामना कठोरपणे आणि निर्णायकपणे केला जाईल, हे देशाने स्पष्ट केले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सांगितले.
मन की बातच्या १३८व्या भागात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सर्जिकल स्ट्राइकला १० वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, २८-२९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली होती. दहशतवादामुळे भारताने दीर्घकाळ वेदना सहन केल्या आहेत. सर्जिकल स्ट्राइक हे त्याविरोधातील निर्णायक प्रत्युत्तर होते.
मोदी यांनी बालाकोट एअर स्ट्राइक आणि ऑपरेशन सिंदूरचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, भारताने आपली भूमिका वारंवार स्पष्ट केली आहे. दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला केला, तर त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल. मोदी यांनी सांगितले की, आजचा भारत दहशतवादाविरोधात शून्य सहनशीलतेच्या धोरणावर चालत आहे.
त्यांनी २००८ मधील दिल्लीतील साखळी बॉम्बस्फोट आणि २६/११ मुंबई हल्ल्याचीही आठवण केली. तसेच ९/११ हल्ल्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. त्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण केली. पीडित कुटुंबीयांप्रति संवेदनाही व्यक्त केली.
तसेच जनगणना हे आपल्या सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. १५ ऑगस्टलाही मी देशवासीयांना यासाठी आपला वेळ नक्की काढण्याचे आवाहन केले होते. जनगणनेसाठी आपली माहिती स्वतः नोंदवण्याची ही सुविधा अतिशय सोपी आहे. आपण आपल्या मोबाइलवरूनच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची माहिती नोंदवू शकता, असे त्यांनी सांगितले.
कुपोषणमुक्तीच्या प्रयत्नांचे कौतुक
कुपोषण संपवण्यासाठी यावर्षी अनेक चांगले उपक्रम सुरू झाले आहेत. महाराष्ट्रही या दिशेने खूप चांगले काम करत आहे. तिथे शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि पालक जनजागृती मोहिमेत सहभागी होत आहेत. मिझोराममध्येही यावर्षी लोक एकत्र येऊन पोषण वाटिका जपण्यासाठी मोहीम राबवत आहेत.
हे मिझो परंपरेतील तालो-मद-याना या संकल्पनेशी जोडलेले आहे, ज्याचा अर्थ निस्वार्थ सेवा आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी पुढे असणे असा होतो. असे प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहेत, असेही त्यांनी (Narendra Modi) नमूद केले.






