धमकी प्रकरणी भारतीय महिलेला अमेरिकेत अटक
Updated On:

कॅलिफोर्निया – कॅलिफोर्नियामध्ये बुधवारी बेकर्सफील्ड सिटी कौन्सिलच्या बैठकीदरम्यान, कौन्सिल सदस्यांना धमक्या दिल्याबद्दल रिद्धी पटेल या आंदोलक महिलेला अटक करण्यात आली.
त्यांनी कौन्सिल सदस्य आणि रिपब्लिकन महापौर कॅरेन गोह यांना भयंकर धमक्या दिल्या. त्यांनी इस्रायलविरूद्ध युद्धविराम ठरावाला पाठिंबा न दिल्यच्या निषेधार्थ या धमक्या दिल्या गेल्या. यामुळे इस्रायलविरोधी चालू असलेल्या प्रतिसादात सरकारी इमारतीत सुरक्षा उपाय वाढवण्यात आली आहे.
रिद्धी पटेल ही २८ वर्षांची पॅलेस्टाईन समर्थक भारतीय अमेरिकन नागरिक आहे. बेकर्स फील्डमधूनच कार्यरत असलेल्या कॅलिफोर्नियास्थित वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, संस्थेच्या वेबसाइट आणि तिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार रिद्धी पटेल ही वंश, गरीबी आणि पर्यावरण केंद्रासाठी आर्थिक विकास समन्वयक आहे.





