BREAKING NEWS : भारताचा अचंता शरद पुरुष एकेरीच्या टेबल टेनिसच्या तिसऱ्या फेरीत दाखल
Updated On:

टोकियो – टोकियो ऑलिंपिकच्या चौथ्या दिवशी सकाळी भारताच्या अचंता शरतने आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवत पुरुष एकेरीच्या टेबल टेनिस स्पर्धेमध्ये तिसरी फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे.
त्याने पोर्तुगालच्या टियागो अपोलोनिया याच्यावर 4-2 ने मात केली. पहिल्या गेममध्ये 2-11, 11-8, 11-5, 9-11, 11-6 आणि 11-9 गुणसंख्या झाली.
अत्यंत आक्रमक आणि धोरणात्मक खेळ अचंता शरद ने अपोलोनिया ला कोणतीही संधी दिली नाही सामन्याचे पारडे दुसऱ्या गेम पर्यंत समसमान होते त्यानंतर अचंता शरतने आघाडी घेत खेळ सातव्या गेम मध्ये जाऊ दिला नाही आणि भारतासाठी एक दिमाखदार विजय मिळवला.





