Amit Mishra Retirement : आयपीएलमध्ये तिनदा हॅट्रिक घेणाऱ्या एकमेव गोलंदाजानी सर्व प्रकारच्या क्रिकेटला ठोकला रामराम

Amit Mishra Announce Retirement : भारतीय संघाचा दिग्गज लेगस्पिनर अमित मिश्रा याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो भारतीय संघाचा हिस्सा नव्हता. आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळणारा अमित मिश्रा आता भारतीय संघाच्या जर्सीत दिसणार नाही. तब्बल 25 वर्षे क्रिकेट खेळणाऱ्या मिश्राने आपल्या कारकिर्दीत अनेक उल्लेखनीय कामगिरी केल्या.
अमित मिश्राने 2017 मध्ये भारतीय संघाकडून शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतरही त्याने भारतीय संघात पुनरागमनाची आशा कायम ठेवली होती. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये त्याने आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली, परंतु त्याला पुन्हा भारतीय संघात स्थान मिळाले नाही. आयपीएल 2024 मध्ये त्याने लखनऊ सुपर जायंट्सकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना खेळला होता. आयपीएल 2025 मध्येही तो लखनऊ सुपर जायंट्स संघाचा हिस्सा होता.
निवृत्तीवर काय म्हणाला अमित मिश्रा?
Today, after 25 years, I announce my retirement from cricket — a game that has been my first love, my teacher, and my greatest source of joy.
This journey has been filled with countless emotions — moments of pride, hardship, learning, and love. I am deeply grateful to the BCCI,… pic.twitter.com/ouEzjU8cnp
— Amit Mishra (@MishiAmit) September 4, 2025
अमित मिश्राने न्यूज एजेंसी आयएएनएसला दिलेल्या निवेदनात निवृत्तीची घोषणा केली. तो म्हणाला, “क्रिकेटमधील माझी 25 वर्षे अविस्मरणीय राहिली आहेत. बीसीसीआय, हरियाणा क्रिकेट असोसिएशन, सहकारी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच, मला प्रेम आणि पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांचेही मी आभारी आहे. क्रिकेटने मला असंख्य आठवणी दिल्या, ज्या मी आयुष्यभर जपेन.” 42 वर्षीय अमित मिश्राच्या निवृत्तीमागील कारण त्याच्या सततच्या दुखापती असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा – शिखर धवन अडकला EDच्या कचाट्यात; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या…
आयपीएलमधील अनोखा विक्रम –
आयपीएलमध्ये अमित मिश्राने तीन वेळा हॅटट्रिक घेण्याचा अनोखा विक्रम नोंदवला आहे. 2008 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, 2011 मध्ये डेक्कन चार्जर्स आणि 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने हा पराक्रम केला. हा तो काळ होता जेव्हा अमित मिश्रा क्रिकेट विश्वात आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालत होता. भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानेही अनेकदा मिश्रा याच्या अप्रतिम प्रतिभेचे कौतुक केले आहे.
हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्माची कमाल! तब्बल २० किलो वजन घटवत ब्रोंको टेस्ट केली पास, चाहतेही झाले चकित
अमित मिश्राची आकडेवारी –
अमित मिश्राने टीम इंडियासाठी २२ कसोटी, ३६ एकदिवसीय आणि १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ४० कसोटी डावांमध्ये त्याने ३५.७२ च्या सरासरीने ७ बळी घेतले आहेत. ३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने २३.६३ च्या सरासरीने ६४ बळी घेतले आहेत. जर आपण टी-२० बद्दल बोललो तर त्याने १० सामन्यांमध्ये १६ बळी घेतले आहेत. या सर्वांव्यतिरिक्त, त्याने आयपीएलमध्ये आपले कौशल्य दाखवले आहे. मिश्राने १६२ आयपीएल सामन्यांमध्ये १७४ बळी घेतले आहेत.





