शिखर धवन अडकला EDच्या कचाट्यात; काय आहे नेमकं प्रकरण? जाणून घ्या…

Shikhar Dhawan ED Summons | भारताचा क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सलामीचा फलंदाज शिखर धवन अडचणीत सापडला आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ED) शिखर धवनला नोटीस पाठवली आहे. ऑनलाइन सट्टा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी हरभजन सिंग आणि सुरैश रैना यांना ईडीने नोटीस पाठवली होती. अशातच आता शिखर धवन देखील ईडीच्या कचाट्यात सापडला आहे.
पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, 1xBet नावाच्या ऑनलाईन बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित पैशांच्या गैरव्यवहाराची ईडी चौकशी करत आहे. याच प्रकरणात धवनने सोशल मीडियावर या ॲपचा प्रचार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे ईडीकडून धवनची चौकशी केली जाणार आहे.
The Enforcement Directorate has summoned cricketer Shikhar Dhawan today at 11 am in a money laundering case connected to the illegal 1xBet betting platform: Officials
— ANI (@ANI) September 4, 2025
काय आहे नेमकं प्रकरण?
आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडीकडून 1xBet नावाच्या अवैध सट्टेबाजी अॅपसंदर्भातील प्रकरणाचा तपास सुरु आहे. संबंधित बेटिंग अॅपच्या माध्यमातून अनेक लोक आणि गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली आहे. या अॅपच्या जाहिरातीमध्ये दिसल्यामुळे या प्रकरणात शिखर धवनचा जबाब नोंदवला जाणार आहे.
ऑनलाईन गेमिंग अॅपसंदर्भातील प्रकरणात शिखर धवन आधी अन्य काही क्रिकेटर्संही ईडीच्या रडारवर आल्याचे पाहायला मिळाले आहे. यात भारताचा माजी अष्टपैलू आणि IPL स्पेशलिस्ट सुरेश रैनासह हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांचीही ईडीनं चौकशी केली होती. क्रिकेटर्सशिवाय अन्य काही सेलिब्रिटींही ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. या यादीत विजय देवरकोंडा, राणा दग्गुबाती, प्रकाश राज, हरभजन सिंग, उर्वशी रौतेला यांचाही समावेश आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने अलीकडेच ऑनलाइन रिअल मनी गेमिंग प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्यासाठी नवीन कायदा लागू केला आहे.
हेही वाचा:





