Saffron Jersey Controversy : “केवळ जर्सी बदलून इतिहास बदलणार नाही…”, भारतीय हॉकी संघाच्या जर्सीवरुन प्रियांका गांधीचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Saffron Jersey Controversy : इंडियन हॉकी फेडरेशनने (IHF) भारतीय हॉकी संघाच्या जर्सी आणि किटमध्ये एक मोठा व वादग्रस्त बदल केला आहे, ज्यामुळे मोठा वाद पेटलाय.

Indian Hockey Team New Saffron Jersey Controversy Priyanka Gandhi Viren Rasquinha : हॉकी वर्ल्ड कप २०२६ (Hockey World Cup 2026) सुरू होण्यापूर्वी इंडियन हॉकी फेडरेशनने (IHF) भारतीय हॉकी संघाच्या जर्सी आणि किटमध्ये एक मोठा व वादग्रस्त बदल केला आहे. फेडरेशनने भारतीय संघाच्या जर्सीचा पारंपारिक रंग बदलून तो ‘भगवा’ (Saffron) केला आहे. या निर्णयामुळे क्रीडा विश्वापासून ते राजकीय वर्तुळापर्यंत तीव्र पडसाद उमटत असून, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह माजी भारतीय खेळाडूंनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. (Saffron Jersey Controversy)
“केवळ जर्सी बदलून इतिहास बदलणार नाही!” – प्रियांका गांधी (Saffron Jersey Controversy)
या बदलावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मीडियाशी बोलताना त्या म्हणाल्या, “केवळ युनिफॉर्मचा रंग बदलून किंवा शिक्षण पद्धतीत बदल करून देशाचा इतिहास बदलता येत नाही. देशातील तरुण हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. भारताचा स्वातंत्र्यलढा सत्य आणि अहिंसेच्या तत्त्वांवर लढला गेला होता आणि त्यात आरएसएसची (RSS) कोणतीही भूमिका नव्हती, हे संपूर्ण देशाला ठाऊक आहे.” समाजात कितीही द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केला, तरी देशाचा मूळ आत्मा कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असा घणाघात त्यांनी केला.
#WATCH | Delhi: On Hockey India changed national team jerseys from blue to saffron, Congress MP Priyanka Gandhi Vadra says, “Whether they change uniforms or try to rewrite history through education policy, no matter what they do… You have seen what the youth of our country… pic.twitter.com/EGCcFnxcxA
— ANI (@ANI) July 30, 2026
माजी कर्णधार विरेन रास्किन्हाचा हल्लाबोल! (Saffron Jersey Controversy)
फेडरेशनच्या या निर्णयावर भारताचे माजी हॉकी कर्णधार विरेन रास्किन्हा (Viren Rasquinha) यांनी तीव्र चिंता व्यक्त करत या प्रकाराला ‘शर्मनाक’ म्हटले आहे. जर्सीच्या या राजकीय रंगबदलावर विरोधकही आक्रमक झाले असून राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) खासदार सुधाकर सिंह यांनी सत्ताधाऱ्यांवर तिखट शब्दांत टीका केली आहे. सत्ताधारी लोक ‘मानसिकदृष्ट्या दिवाळखोर’ झाले असून, भविष्यात हे लोक हिरव्या रंगाच्या झाडांनाही भगवा रंग लावतील, असा टोला त्यांनी लगावला.
उगवत्या सूर्यापासून प्रेरित भगवा रंग – (Saffron Jersey Controversy)
Presenting the new India jersey! 🇮🇳
Every stitch tells a story. Every pattern, every colour carries India’s pride.
Our teams are ready to once again do the country proud at the FIH Hockey World Cup Belgium & Netherlands 2026.
🎥: Select 2 (SD+HD)+ Khel & JioHotstar
🗓️: August… pic.twitter.com/8GvwbByapq— Hockey India (@TheHockeyIndia) July 27, 2026
हॉकी इंडियानुसार, भगवा रंग ‘शौर्य, त्याग आणि विजय’ यांचे प्रतीक आहे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक म्हणून भारतीय राष्ट्रध्वज व उगवत्या सूर्यापासून प्रेरणा घेतो. या जर्सीवर भारताच्या सांस्कृतिक वारशाचा गौरव करणारा मंडला-प्रेरित नमुना, प्रगती, शांती आणि एकाग्रता दर्शवणारा अशोकचक्रापासून प्रेरित गडद निळा भाग आणि सामर्थ्य, एकता व गती यांचे प्रतीक असलेले छातीवरील सुदर्शन चक्राचे आधुनिक रूप आहे.





