Dilip Tirkey Clarification : “जर्सीचा रंग आम्ही राजकीय हेतूने नाही, तर…”; हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांची ‘भगव्या’ जर्सीच्या वादावर स्पष्टोक्ती
Dilip Tirkey Clarification : आता या सर्व वादावर हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात महत्त्वाची स्पष्टोक्ती दिली आहे.

Hockey India President Dilip Tirkey Clarification On Saffron Jersey Controversy : बेल्जियम आणि नेदरलँड्सच्या संयुक्त यजमानपदाखाली १५ ते ३० ऑगस्ट दरम्यान रंगणाऱ्या एफआयएच (FIH) हॉकी वर्ल्ड कप २०२६ साठी हॉकी इंडियाने (Hockey India) भारतीय संघाची घोषणा आधीच केली आहे. मात्र, अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या भारतीय संघाच्या भगव्या (ऑरेंज) जर्सीवरून देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. भारताची पारंपारिक ओळख असलेला निळा रंग बदलण्यावर माजी कर्णधार विरेन रासक्विन्हा आणि प्रियांका गांधी यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता या सर्व वादावर हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप टिर्की (Dilip Tirkey) यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात महत्त्वाची स्पष्टोक्ती दिली आहे.
‘ब्लू टर्फ’मुळे खेळाडूंच्याच सांगण्यावरून बदलला रंग!
जर्सीचा रंग बदलण्यामागील तांत्रिक कारण स्पष्ट करताना दिलीप टिर्की म्हणाले, “हा निर्णय कोणत्याही राजकीय दबावाखाली घेतलेला नाही, तर खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या (Support Staff) सूचनेवरून घेतला आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी सामन्यांचे मैदान (टर्फ) निळ्या रंगाचे (Blue Turf) असते. जर्सी आणि टर्फ दोन्ही निळ्या रंगाचे असल्यामुळे मैदानावर खेळाडूंना एकमेकांना ओळखण्यात आणि ‘व्हिझिबिलिटी’मध्ये (Visibility) मोठी अडचण येत होती.”
VIDEO | On Hockey India changing the national team’s jersey colour from blue to saffron, Hockey India President Dilip Kumar Tirkey clarified:
“Both the Indian men’s and women’s teams will play in the Hockey World Cup from August 15. I hope both teams perform very well,… https://t.co/UU5qoMbTK2 pic.twitter.com/6uojcBFJI3
— Press Trust of India (@PTI_News) July 30, 2026
टिर्की यांनी पुढे सांगितले की, नवीन जर्सीसाठी पिवळा आणि ऑरेंज असे दोन पर्याय आले होते. त्यापैकी ऑरेंज रंग निवडण्यात आला, जो आपल्या राष्ट्रध्वजातील तीन रंगांपैकी एक आहे. जर विश्वचषकानंतर खेळाडूंना हा रंग आवडला नाही, तर त्यात पुन्हा आवश्यक ते बदल केले जातील.
Presenting the new India jersey! 🇮🇳
Every stitch tells a story. Every pattern, every colour carries India’s pride.
Our teams are ready to once again do the country proud at the FIH Hockey World Cup Belgium & Netherlands 2026.
🎥: Select 2 (SD+HD)+ Khel & JioHotstar
🗓️: August… pic.twitter.com/8GvwbByapq— Hockey India (@TheHockeyIndia) July 27, 2026
जर्सीचा रंग बदलण्याची ही पहिली वेळ नाही!
हॉकी इंडियाच्या अध्यक्षांनी स्पष्ट केले की, भारतीय हॉकी टीमची जर्सी बदलण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी:
- २०१४ विश्वचषक: भारतीय संघ ‘पिवळ्या’ (Yellow) रंगाच्या जर्सीत मैदानात उतरला होता.
- २०१८ विश्वचषक: भारतीय संघाने ‘स्काय ब्लू’ (Sky Blue) रंगाची जर्सी परिधान केली होती.
भारतीय संघ या मेगा टूर्नामेंटमध्ये १९ ऑगस्ट रोजी वेल्स (Wales) विरुद्ध खेळून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.





