LA 2028 Olympics : आगामी ऑलिंपिकमध्ये भारत सुवर्णपदक पटकावेल – पी. आर. श्रीजेश

Hockey India, LA 2028 Olympics :- भारताची हॉकीतील ‘द वॉल’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या पी. आर. श्रीजेशने लॉस एंजेलिसमध्ये 2028 साली होणाऱ्या 34 व्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघ सुवर्णपदक पटकावेल, असा विश्वास व्यक्त केला. दिल्ली येथील एका कार्यक्रमासाठी श्रीजेश आला होता, त्यावेळी बोलताना त्याने हा विश्वास व्यक्त केला.
भारताकडे मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आहे. माझी जागी निवडण्यात आलेला कृष्ण पाठक हा देखील चांगला गोलरक्षक असून, हाच संघ सुवर्णपदक जिंकण्यासाठी सक्षम असल्याचे श्रीजेशने सांगितले.
बिहारच्या राजगीर येथे नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुलाची निर्मिती करण्यात आली आहे. यावर देखील त्याने भाष्य करताना म्हटले की, बिहारमध्ये मी मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल पाहतो आहे. येथे आता अजून एका टर्फची निर्मिती करण्यात आली आहे, जी खेळाडूंसाठी आवश्यक होती. या वर्षाच्या अखेरीस या मैदानावर महिलांची आशियाई हॉकी स्पर्धा रंगणार असल्याचे त्याने सांगितले.





