FIH Hockey Star Awards 2024 : हरमनप्रीत आणि श्रीजेश ‘एफआयएच’च्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित…

FIH Hockey Stars awards in Oman : भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि महान खेळाडू पीआर श्रीजेश यांनी 2024 सालचे अनुक्रमे एफआयएच प्लेयर ऑफ द इयर ( FIH Player of the Year) आणि एफआयएच गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार (FIH Goalkeeper of the Year award) जिंकले आहेत. हरमनप्रीत आणि श्रीजेश या दोघांनाही शुक्रवारी (8 नोव्हेंबर) रात्री ओमानमध्ये 49व्या एफआयएच (FIH) पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.
हरमनप्रीतने नेदरलँड्सचा जोएफ डी मोल आणि थियरी ब्रिंकमन, जर्मनीचा हॅनेस मुलर आणि इंग्लंडचा जॅक वॉलेस यांना मागे टाकून अव्वल पुरस्कार जिंकला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक 10 गोल केले होते. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत गोल करण्याव्यतिरिक्त, त्याने स्पेनविरुद्धच्या कांस्यपदकाच्या सामन्यात भारतासाठी दोन्ही गोल केले. भारताने हा सामना 2-1 ने जिंकला आणि ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा पोडियम वर स्थान मिळवले होते.
हरमनप्रीतने याआधी 2020-21 आणि 2021-22 मध्ये FIH प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला होता परंतु तिसरा सन्मान महत्त्वाचा आहे कारण त्यानं ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर तो मिळवला आहे. कर्णधार म्हणून हा त्याचा पहिला सन्मान आहे.
Some golden moments captured from last night’s FIH Hockey Stars awards in Oman. 📸
Moment of Pride for Indian Hockey as Our Sr. Men’s team Captain and Charismatic Leader Harmanpreet Singh & ‘God of Modern Indian Hockey’ and Head Coach of Indian Jr. Men’s team Coach P.R Sreejesh,… pic.twitter.com/e0GMYo5zJs
— Hockey India (@TheHockeyIndia) November 9, 2024
श्रीजेशनेही तिसऱ्यांदाही जिंकला पुरस्कार….
ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणाऱ्या श्रीजेशने तिसऱ्यांदा वर्षातील सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा पुरस्कारही पटकावला. यापूर्वी त्याने 2020-21 आणि 2021-22 मध्ये हा पुरस्कार जिंकला होता. श्रीजेश म्हणाला, ‘मी आज खूप आनंदी आहे. माझ्या क्रीडा कारकिर्दीतील या शेवटच्या क्रीडा सन्मानाबद्दल धन्यवाद. हा पुरस्कार पूर्णपणे माझ्या टीमचा आहे.”
Korea Masters 2024 (Badminton) : किरण जॉर्जची विजयी मोहीम उपांत्य फेरीत संपुष्टात….
FIH : पुरस्कारांचे इतर विजेते पुढीलप्रमाणे – नेदरलँडची यिबी जॅनसेन (वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू), चीनची ये जिओ (वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला गोलकीपर), पाकिस्तानचा सुफयान खान (वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष उदयोन्मुख खेळाडू), अर्जेंटिनाची जो डियाझ (वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला उदयोन्मुख खेळाडू), नेदरलँड्सचे जेरोएन डेल्मी (वर्षातील सर्वोत्तम पुरुष प्रशिक्षक), ॲलिसन अन्नान (वर्षातील सर्वोत्तम महिला प्रशिक्षक), ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह रॉजर्स (वर्षातील सर्वोत्तम पुरुष पंच), स्कॉटलंडच्या सारा विल्सन (वर्षातील सर्वोत्तम महिला पंच) .





