FIH Goalkeeper of the Year award 2024 : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जे गोल वाचवले ते माझ्यासाठी नव्हे तर देशासाठी – पीआर श्रीजेश

FIH Men’s Goalkeeper of the Year award 2024 : – भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार कामगिरी करताना कांस्यपदक पटकावले होते. यामध्ये भारताचा गोलरक्षक असलेल्या पीआर श्रीजेशने महत्वपूर्ण भूमिका घेतली होती. या स्पर्धेत त्याने मोक्याच्या क्षणी अनेक गोल अडवून भारताचा बचाव केला होता. स्पर्धेतील अलौकिक कामगिरीसाठी 36 वर्षांच्या श्रीजेशला एफआयएच पुरुष ‘सर्वोत्तम गोलरक्षक’ या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
The “God of Modern Indian Hockey” P R Sreejesh reflects on his nomination for the FIH Men’s Goalkeeper of the Year award.#HockeyIndia #IndiaKaGame #VoteNow
.
.
.
.@CMO_Odisha @IndiaSports @Media_SAI@sports_odisha @Limca_Official @CocaCola @FIH_Hockey pic.twitter.com/83JGG9F1qy— Hockey India (@TheHockeyIndia) September 20, 2024
या संदर्भात बोलताना श्रीजेश म्हणाला की, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मी जे काही गोल वाचवले ते केवळ माझ्यासाठी नव्हते तर संपूर्ण संघ आणि आपल्या देशाच्या पाठिंब्यासाठी होते. या पुरस्कारासाठी नामांकन मिळणे हे आपल्या सर्वांच्या एकत्रित कामगिरीचे आणि अद्भुत प्रवासाचे प्रतिबिंब आहे. मला आशा आहे की माझी कारकीर्द भविष्यातील पिढ्यांना हॉकीच्या मैदानावर त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी प्रेरणा देईल.
श्रीजेशने ऑलिम्पिक संपल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. त्यांच्या निवृत्तीनंतर पंतप्रधान मोदीनी देखील पत्राद्वारे त्याच्या कारकिर्दीचे कौतुक केले होते. हॉकीतून निवृत्त झाल्यानंतर भारतीय हॉकीने त्यांच्याकडे कनिष्ठ राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षकपद सोपविले आहे.
दरम्यान, 36 वर्षीय दिग्गज खेळाडूसाठी नामांकन हे पुरस्कारांच्या मालिकेतील नवीनतम आहे, ज्याला बऱ्याचदा ‘भारतीय हॉकीची महान भिंत’ म्हणून संबोधले जाते. श्रीजेशच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ज्यामध्ये 2021 आणि 2022 मध्ये FIH गोलकीपर ऑफ द इयर, अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि वर्ल्ड गेम्स एथलीट ऑफ द ईयर यांचा समावेश आहे. आपल्या 18 वर्षांच्या कारकिर्दीत, त्याने 300 हून अधिक सामने आणि चार ऑलिम्पिक खेळांमध्ये (लंडन 2012, रिओ 2016, टोकियो 2020 आणि पॅरिस 2024) भारताचे प्रतिनिधित्व केले आहे .





