Indian Football Team : भारतीय फुटबॉल संघाचा अपमान! कोचीमध्ये मुख्य प्रशिक्षक आणि खेळाडूंना स्टेडियमध्ये प्रवेश नाकारला, नेमकं कारण काय?
Indian Football Team : कोची येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सरावासाठी गेलेल्या भारतीय राष्ट्रीय संघाला गेटवरच रोखण्यात आल्याने क्रीडाप्रेमींमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Indian Football Team Denied Entry Kochi stadium : ‘एएफसी आशियाई चषक’ पात्रता फेरीच्या तयारीसाठी सज्ज असलेल्या भारतीय फुटबॉल संघाला प्रशासकीय अनागोंदीचा मोठा फटका बसला आहे. ३१ मार्च रोजी होणाऱ्या हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव करण्यासाठी गेलेले मुख्य प्रशिक्षक खालिद जमील आणि स्टार खेळाडूंना स्टेडियमच्या सुरक्षारक्षकांनी आत सोडण्यास नकार दिला. पैशांच्या देवाणघेवाणीवरून घडलेल्या या प्रकारामुळे भारतीय फुटबॉलची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे.
नेमकं प्रकरण काय? Indian Football Team
जवाहरलाल नेहरू स्टेडियमची मालकी ‘ग्रेटर कोचीन डेव्हलपमेंट अथॉरिटी’कडे (GCDA) आहे. नियमानुसार, केरळ फुटबॉल असोसिएशनला स्टेडियम वापरासाठी २५ लाख रुपये सुरक्षा ठेव (Security Deposit) आणि ३ लाख रुपये भाडे भरायचे होते. मात्र, ही रक्कम वेळेत जमा न झाल्याचे कारण देत प्राधिकरणाने स्टेडियमचे मुख्य गेट उघडण्यास स्पष्ट नकार दिला.
तब्बल १० किमी लांब करावा लागला सराव – Indian Football Team
കടക്ക് പുറത്ത്!
സീനിയർ ഫുട്ബോൾ ടീമിൻറെ പരിശീലകനെയും കളിക്കാരെയും അപമാനിച്ച് GCDA
ഈ വാടകഗുണ്ടായിസത്തിന്റെ വാർത്തകൾ വായിക്കാം 27/03 വെള്ളിയാഴ്ചയിലെ മനോരമയിൽ#IndianFootball #jnlstadium #kaloorstadium #GCDA #indianfootballteam #kochi #Manorama #MalayalaManorama pic.twitter.com/pNUkuaRUze
— Malayala Manorama (@ManoramaDaily) March 26, 2026
प्रशिक्षक खालिद जमील यांच्यासह आशिक कुरुनियान, सहल अब्दुल समद आणि बिजोय वर्गीस यांसारखे महत्त्वाचे खेळाडू सरावासाठी आणि पत्रकार परिषदेसाठी स्टेडियमवर पोहोचले होते. बराच वेळ गेटबाहेर ताटकळत उभे राहिल्यानंतरही प्रवेश न मिळाल्याने खेळाडूंना माघारी फिरावे लागले. अखेर भारतीय संघाला मुख्य स्टेडियमपासून १० किमी दूर असलेल्या केरळ ब्लास्टर्सच्या मैदानावर सराव उरकावा लागला. या गोंधळामुळे महत्त्वाची पत्रकार परिषदही रद्द करावी लागली.
प्रशासकीय समन्वयाचा अभाव – Indian Football Team
कोचीमध्ये तब्बल १० वर्षांनंतर भारतीय राष्ट्रीय संघाचा सामना होत आहे. अशा ऐतिहासिक क्षणी ‘ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन’ (AIFF) आणि स्थानिक असोसिएशनमधील समन्वयाचा अभाव दिसून आला आहे. एआयएफएफने यावर तांत्रिक अडचणीचे कारण दिले असले तरी, खेळाडूंना मिळालेल्या या वागणुकीमुळे क्रीडा वर्तुळातून तीव्र टीका होत आहे.





