Spain World Cup Coincidence : स्पेन फुटबॉलमध्ये जगज्जेता अन् भारताचा २०२७ चा क्रिकेट वर्ल्डकप पक्का? फिफा फायनलच्या निकालानंतर रंजक योगायोगाची तुफान चर्चा!
Spain World Cup Coincidence : स्पेनच्या या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रीडा वर्तुळात आणि क्रिकेटप्रेमींमध्ये एका अत्यंत रंजक योगायोगाची तुफान चर्चा रंगली आहे.

Spain Wins FIFA World Cup 2026 Beats Argentina Coincidence India Cricket : फिफा फुटबॉल विश्वचषक २०२६ (FIFA World Cup 2026) च्या थरारक अंतिम सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनावर १-० अशी मात करत स्पेनने विश्वविजेतेपदावर आपले नाव कोरले आहे. २०१० नंतर तब्बल १६ वर्षांनी स्पेनचे हे दुसरे विजेतेपद ठरले. मात्र, स्पेनच्या या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रीडा वर्तुळात आणि क्रिकेटप्रेमींमध्ये एका अत्यंत रंजक योगायोगाची (Coincidence) तुफान चर्चा रंगली आहे. स्पेनच्या या फुटबॉल विजयाचा थेट संबंध २०२७ च्या आगामी आयसीसी वनडे क्रिकेट विश्वचषकाशी जोडला जात आहे. (Spain World Cup Coincidence)
काय आहे ‘हा’ अजब योगायोग? (Spain World Cup Coincidence)
क्रीडा विश्वात योगायोगांना मोठे स्थान असते. या योगायोगानुसार, ज्या वर्षी स्पेन फुटबॉल विश्वचषक जिंकतो, त्याच्या अगदी दुसऱ्याच वर्षी भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकप ट्रॉफी उंचावतो! इतिहासाची पाने चाळल्यास, २०१० साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या फुटबॉल विश्वचषकात स्पेनने नेदरलँड्सचा १-० पराभव करत पहिल्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्याच्या बरोबर पुढील वर्षी, म्हणजेच २०११ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता.
Champions.#FIFAWorldCup pic.twitter.com/h7BTVx8R6A
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) July 19, 2026
२०२६ आणि २०२७ चे समीकरण; भारताचा रस्ता साफ? (Spain World Cup Coincidence)
WATCH: Spain lifts the FIFA World Cup trophy.
The FIFA World Cup 2026 has come to an end. pic.twitter.com/Wcr1As5ZQP
— Clash Report (@clashreport) July 19, 2026
तब्बल १६ वर्षांनंतर हा योगायोग पुन्हा एकदा तंतोतंत जुळून आला आहे. २०२६ मध्ये लिओनेल मेसीच्या अर्जेंटिनाला नमवून स्पेनने पुन्हा फुटबॉल विश्वचषक जिंकला आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षी २०२७ मध्ये होणारा आयसीसी क्रिकेट विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत रंगणार आहे.
त्यामुळे २०१०-२०११ च्या पॅटर्ननुसार आता २०२६ मधील स्पेनच्या यशानंतर २०२७ चा क्रिकेट विश्वचषक भारतच जिंकणार, असा ठाम दावा सोशल मीडियावर क्रिकेट चाहत्यांकडून केला जात आहे. (Spain World Cup Coincidence)





