Deepti Sharma : टीम इंडियाच्या स्टार खेळाडूची २५ लाखांची फसवणूक, सहकारी खेळाडूनेच लावला चुना, काय आहे प्रकरण?

Deepti Sharma Files Fraud and Theft Case Against Teammate Arushi Goyal : टीम इंडियाची स्टार खेळाडू दीप्ती शर्माने तिची सहकारी खेळाडू आरुषी गोयलविरुद्ध २५ लाख रुपयांची फसवणूक आणि चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आगरा येथील सदर पोलीस ठाण्यात दीप्तीच्या भावाने (सुमित शर्मा) तक्रार दाखल केली आहे. दीप्तीचा आरोप आहे की, आरुषीने तिच्या आगरा येथील फ्लॅटमधून २५ लाख रुपये, सोन्या-चांदीचे दागिने आणि सुमारे २ लाख रुपये किमतीचे विदेशी चलन (२,५०० अमेरिकी डॉलर) चोरले आहे.
दीप्ती आणि आरुषी यांची मैत्री क्रिकेटच्या मैदानापासून सुरू झाली. दोघींनी महिला प्रीमियर लीगमध्ये (WPL) यूपी वॉरियर्स संघाकडून एकत्र खेळले आहे, जिथे दीप्ती ही कर्णधार आहे. याशिवाय, दोघी घरेलू क्रिकेटमध्येही एकत्र खेळल्या आहेत. आरुषी सध्या भारतीय रेल्वेत आगरा कँट रेल्वे स्टेशनवर कनिष्ठ लिपिक (ज्युनियर क्लर्क) म्हणून कार्यरत आहे.
दीप्तीच्या तक्रारीत काय आहेत आरोप?
Agra, Uttar Pradesh: Deepti Sharma, UP DSP and Indian women’s cricketer, along with junior player Arushi Goyal and her family, face a ₹25 lakh fraud case. Deepti’s brother filed an FIR after valuables went missing from her flat. Investigation is ongoing, says DCP Sonam Kumar pic.twitter.com/adGEH9JlSm
— IANS (@ians_india) May 22, 2025
दीप्तीच्या तक्रारीनुसार, आरुषी आणि तिच्या पालकांनी दीप्तीचा विश्वास संपादन करून गेल्या दोन वर्षांत वेगवेगळ्या वेळी तिच्याकडून २५ लाख रुपये उधार घेतले. जेव्हा दीप्तीने पैसे परत मागितले, तेव्हा आरुषी आणि तिच्या कुटुंबीयांनी टाळाटाळ केली आणि अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे दीप्तीने आरुषीला तिच्या आगरा येथील राजेश्वर मंदिराजवळील फ्लॅटवर येण्यास मनाई केली होती.
हेही वाचा – Vaibhav Suryavanshi : आयपीएल २०२५ गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशीचे समस्तीपूरमध्ये जंगी स्वागत, पाहा VIDEO
फ्लॅटचा टाळा तोडून चोरी –
भारतीय महिला क्रिकेटर दीप्ति शर्मा के साथ धोखाधड़ी का फ्लैट में चोरी करने का मामला सामने आया है, दीप्ति शर्मा के भाई ने थाना सदर बाजार पर मुकदमा दर्ज कराया है।#DeeptiSharma #CricketScandal #IndianWomenCricket #CrimeNews #CricketNews pic.twitter.com/HqaVhYlErR
— डाइनामाइट न्यूज़ हिंदी (@DNHindi) May 22, 2025
मात्र, २२ एप्रिल २०२५ रोजी दीप्ती परदेशात असताना आरुषीने तिच्या फ्लॅटचा टाळा तोडून आत प्रवेश केला आणि दागिने, विदेशी चलन आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन पळ काढला. तिने फ्लॅटवर स्वतःचा टाळा लावला. दुसऱ्या दिवशी, २३ एप्रिलला, आरुषीने दीप्तीला फोन करून सांगितले की तिचे काही सामान फ्लॅटमध्ये राहिले आहे आणि ते काढण्यासाठी तिला टाळा उघडायचा आहे. दीप्तीने आपला भाऊ सुमितला फ्लॅटवर पाठवले, पण टाळा उघडला गेला नाही. नंतर सीसीटीव्ही फुटेजमधून समजले की आरुषीने एक दिवस आधीच चोरी केली होती.
हेही वाचा – Cricketer Scam : ‘या’ संघात तुझी निवड झाली…; ‘आयपीएल’च्या नावाखाली ‘या’ क्रिकेटपटूला २४ लाखांचा गंडा!
आरुषी गोयल आणि तिच्या पालकांवर फसवणूक-चोरीचा आरोप –
आग्रा पोलिसांनी दीप्तीच्या भावाच्या तक्रारीवरून आरुषी गोयल आणि तिच्या पालकांविरुद्ध फसवणूक आणि चोरीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी विजय विक्रम सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. सीसीटीव्ही फुटेजमधून चोरीच्या घटनेची पुष्टी झाली आहे. आरुषीने या आरोपांना खोटे ठरवले असून ती आपला बाजू कायदेशीररित्या मांडणार असल्याचे सांगितले आहे. या घटनेने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.





