भारतीय कंपन्यांचे वर्षभरात पेटंटसाठी 92 हजार अर्ज

नवी दिल्ली – भारत सरकारने आणि भारतातील कंपन्यांनी मेक इन इंडिया, मेक फॉर इंडिया इत्यादी मोहिमा हाती घेतल्या आहेत. त्यासाठी संशोधन आणि विकासावर भर द्यावा लागतो. सरकारने संशोधन आणि विकासाला चालना देणार्या कंपन्यांना मदत दिली आहे. त्यामुळे कंपन्यातील संशोधन आणि विकास वाढत आहे. परिणामी कंपन्यांची बौद्धिक संपदा वाढत असून भारतातील कंपन्यांनी 2024मध्ये 92 हजार पेटंट साठी अर्ज दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञान विकास या क्षेत्रात भारत आगेकूच करत आहे. सध्याच्या कंपन्याबरोबर स्टार्ट अप या क्षेत्रामध्ये अधिक गुंतवणूक करत असल्याचे वातावरण आहे. पेटंट विषयक नियंत्रण व्यवस्थेचे महानियंत्रक उन्नत पंडित यांनी सांगितले की, दहा वर्षांमध्ये भारतातील पेटंटची संख्या वेगाने वाढत आहे. याचा भारतातील कंपन्यांबरोबरच परदेशातील कंपन्यांना लाभ होऊ शकतो.
भारत बौद्धिक संपदा क्षेत्रात पिछाडीवर होता. त्यामुळे तंत्रज्ञानाची आयात करावी लागत असे. मात्र आगामी काळात भारत तंत्रज्ञानाचे निर्यात करू शकणारा देश होणार आहे. गेल्या वर्षी 92 हजार पेटंट साठी अर्ज दाखल झाला.
याचा अर्थ भारतात प्रत्येक सहा मिनिटाला बौद्धिक संपदेसाठी संरक्षण मागितले जात आहे. ही भारतासाठी अभिमानाची बाब आहे. भारतात दाखल केलेल्या पेटंटचा दर्जा उत्तम आहे. त्याना जागतिक पातळीवर मान्यता वेगात मिळत आहे. त्यामुळे भारतातील संशोधन आणि विकास जागतिक पातळीवरील होत आहे असे त्यांनी सांगितले.





