अमेरिकेत येणाऱ्या औषधांवर 200% आयात शुल्क लावण्याची ट्रम्प यांची वल्गना; भारतीय कंपन्यांचे वाढले लक्ष

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणार्या औषधावर तब्बल 200 टक्के आयात शुल्क लावण्याची वल्गना पुन्हा केली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेला औषध निर्यात करणार्या कंपन्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात अमेरिकेत औषधाची निर्मिती करावी अन्यथा बाहेर देशात तयार झालेल्या औषधावर अमेरिकेत 200 टक्के आयात शुल्क लावण्यात येईल.
मात्र हे आयात शुल्क नेमके कोणत्या तारखेपासून लावणार आहे हे ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही. गेल्या आठवड्यात ट्रम्प यांनी सांगितले की, परदेशातील औषध कंपन्यांनी एक वर्षाच्या आत आपले प्रकल्प अमेरिकेत आणावे. अन्यथा एक वर्षानंतर शुल्क लावले जाईल. ट्रम्प यांनी विशिष्ट प्रकारच्या सेमीकंडक्टरवरही आयात शुल्क लावण्याची घोषणा केली.
भारतातून निर्यात जास्त
भारतातील औषध कंपन्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणात निर्यात करतात. त्यामुळे ट्रम्प यांच्या या घोषणाकडे भारतातील औषधी कंपन्यांचे लक्ष आहे. मात्र अमेरिका भारतीय औषधावर जास्त विसंबून असल्यामळे कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला औषधांची आयात करावी लागेल असे समजले जात आहे.





