Mumbai Coast Guard : मुंबईत तेलाची तस्करी करणारी 3 जहाजे पकडली
Mumbai Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाने मुंबईजवळ आंतरराष्ट्रीय तेल तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे.

Mumbai Coast Guard : भारतीय तटरक्षक दलाने मुंबईजवळील समुद्रात कारवाई करत, तेलाची तस्करी करणारी तीन मोठी परदेशी जहाजे पकडली आहेत. या परदेशी जहाजांमध्ये मोठ्या प्रमाणात तेल साठा सापडला असून, ही जहाजे समुद्रात तेलाची तस्करी करत असल्याचे समोर आले आहे.
मुंबईपासून सुमारे १०० नॉटिकल मैलांवरती पश्चिमेला तटरक्षक दलाने ही जहाजे थांबवली होती. त्यांची झडती घेऊन, कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. चौकशीमध्ये जहाजांचा वापर तेलाच्या तस्करीसाठी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जटिल समु्द्र-हवाई नेटवर्कवर आधारित ऑपरेशनच्या माध्यमातून हे आंतरराष्ट्रीय तेल तस्करी रॅकेट उघडकीस आले आहे. जहाजांनी संघर्षग्रस्त देशांमधून मोठ्या प्रमाणात स्वस्त तेल तस्करी करत होते. ही जहाजे आंतरराष्ट्रीय समुद्रात वस्तूंची देवाणघेवाण करायची.
या सिंडिकेटमध्ये काम करणारे हस्तक अनेक देशांमध्ये सक्रिय आहेत. एका मोटर टँकरचा शोध घेतला. या टँकरच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यामुळे जहाजाच्या हालचालींचा डिजिटल तपास सुरु करण्यात आला. त्या जहाजाच्या आसपास असलेल्या अन्य जहाजांचा डेटा पॅटर्न तपासण्यात आला.
दोन अन्य जहाजांवरील हालचालीदेखील संशयास्पद आढळून आल्या होत्या. या जहाजामधून समुद्रात तेलाशी संबंधित वस्तूंची तस्करी सुरु होती. ही जहाजे भारताच्या सागरी सीमा असलेल्या राज्यांमधील शुल्क चुकवण्याचा प्रयत्न करत होती. पुढील कारवाईसाठी या जहाजांना मुंबईत आणण्यात येणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भारतीय सीमा शुल्क विभाग करत आहे .





