IND W vs SA W Final : स्मृती-हरमनला अश्रू अनावर, अमोल मुझुमदार भावूक; भारताचा विश्वविजय जल्लोषाचा VIDEO व्हायरल

India World Cup winning moment video viral : हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारती महिला क्रिकेट संघाने नवी मुंबईच्या डॉ. डीवाय. पाटील स्टेडियमवर इतिहास रचला आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी शानदार पराभव करत पहिल्या आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाने एकच जल्लोष केला, ज्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
शफाली-दीप्तीचा ‘ऑलराउंड’ परफॉर्मन्स ठरला गेमचेंजर –
भारताच्या या ऐतिहासिक विजयात सलामीची फलंदाज शफाली वर्मा आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा या दोन शिलेदारांनी निर्णायक भूमिका बजावली. शफाली अंतिम सामन्यात तिने 87 धावांची धडाकेबाज खेळी केली आणि गोलंदाजीत दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर दीप्ती शर्माने पण 58 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले, तसेच गोलंदाजीत पाच विकेट्स घेत आणि एका खेळाडूला रनआउट करत संघाच्या विजयात महत्वाती भूमिका बजावली.
Our Women are the Champions! Congratulations to @ImHarmanpreet & entire Indian Women’s Cricket Team for winning the World Cup Finals vs SA. Our first & a milestone victory in the history of the game. Great performances by @TheShafaliVerma & @Deepti_Sharma06 . @BCCI @BCCIWomen pic.twitter.com/LWuhkn2NcD
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) November 2, 2025
अमनजोतचा अचूक थ्रो आणि हरमनप्रीतचा ‘सुपरमॅन’ कॅच
This part of our life, this little part, is called 𝙗𝙚𝙞𝙣𝙜 𝙒𝙤𝙧𝙡𝙙 𝘾𝙝𝙖𝙢𝙥𝙞𝙤𝙣𝙨 💙#AaliRe #CWC25 #INDvSA | Harmanpreet Kaur pic.twitter.com/VkmJYKsewg
— Mumbai Indians (@mipaltan) November 2, 2025
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा क्षण 46 व्या षटकात आला. हे षटक दीप्ती शर्मा टाकत असताना तिसऱ्या चेंडूवर नादिन दे क्लार्कने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याच क्षणी, कर्णधार हरमनप्रीत कौरने मागे धावत जात आणि अचूक वेळेत उडी मारत एक उत्कृष्ट झेल टिपला, जो अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. हा झेल इतका अविश्वसनीय होता की, यासह दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ २४६ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताचा ऐतिहासिक विजय निश्चित झाला.
हेही वाचा – IND W vs SA W Final : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! द. आफ्रिकेला धूळ चारत पहिल्यांदाच विश्वचषकावर कोरलं नाव
हा झेल टिपल्यानंतर हरमनप्रीतने मैदानात हात पसरून धावत जात जल्लोष केला, तर संपूर्ण संघाने एकत्र येत आकाशाकडे बोट दाखवत फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद साजरा केला. तत्पूर्वी, भारताला पहिली आणि महत्त्वपूर्ण विकेट मिळाली होती, जेव्हा अमनजोत कौरने आपल्या अचूक थ्रोच्या जोरावर ताझमीन ब्रिट्सला रनआऊट केले होते.
🇮🇳🤝🇿🇦
Mutual respect. Pure cricketing spirit. 💙💚#INDWvsSAW #WomensWorldCup2025 #CWC2025 #CWC25 pic.twitter.com/8Bah4YJUYe— TTM – Truth That Matters (@TTMUpdate) November 2, 2025
भावूक क्षण! मानधना-हरमन आणि कोच मुझुमदारच्या डोळ्यात अश्रू
The leaders of a WORLD CUP WINNING TEAM 🫡❤️
Captain Harmanpreet Kaur and vice-captain Smriti Mandhana soaking it all in 🏆
Scorecard ▶ https://t.co/TIbbeE4ViO#TeamIndia | #WomenInBlue | #CWC25 | #INDvSA | #Champions | @ImHarmanpreet | @mandhana_smriti pic.twitter.com/MiniHNffb1
— BCCI Women (@BCCIWomen) November 2, 2025
हा ऐतिहासिक विजय मिळवताच भारतीय महिला संघाच्या डगआउटमध्ये आणि मैदानावर अत्यंत भावूक आणि आनंदी वातावरण पाहायला मिळाले. विश्वचषक जिंकल्यानंतर, कर्णधार हरमनप्रीत कौर आणि स्टार फलंदाज स्मृती मानधना यांनी एकमेकांना मिठी मारली आणि दोघींच्याही डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. क्रिकेटच्या मैदानावर क्वचितच भावनिक होणारी स्मृती मानधना या विजयानंतर कमालीची भावनावश झाली होती.
हेही वाचा – IND W vs SA W Final : अमनजोत कौरच्या अचूक थ्रोने फिरला सामना! ब्रिट्सच्या रनआऊटने भारताचे कमबॅक, पाहा VIDEO
खेळाडूंप्रमाणेच, संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार देखील या अविश्वसनीय क्षणाचे साक्षीदार होताना आनंदाने रडताना दिसले. भारताने विश्वचषक जेतेपद पटकावल्यानंतरचा हा जल्लोष आणि हृदयस्पर्शी भावूक क्षणांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यातून या विजयाचे महत्त्व आणि संघासाठीचे भावनिक मोल स्पष्टपणे दिसून येते.





