India vs Bangladesh T20 Series Schedule : टीम इंडियाने कसोटी मालिकेत बांगलादेशला 2-0 ने पराभूत करून मालिकेवर कब्जा केला आहे. घरच्या भूमीवर भारताचा हा सलग 18वा कसोटी मालिका विजय ठरला. आता दोन्ही संघ 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भिडताना दिसणार आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेला 6 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या टी-20 मालिकेचे वेळापत्रक आणि वेळेबद्दल सविस्तर जाणून घेऊया…. कधी व कुठे होणार सामने..? दोन्ही संघांमधील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी ग्वाल्हेरच्या न्यू माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दुसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहे. तर, 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तिसरा आणि अखेरचा सामना खेळवला जाईल. किती वाजता सुरू होतील सामने..? भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामना सकाळी 9.30 वाजता सुरू होत होते. पण, आता दोन्ही संघ टी-20 मालिकेत भिडणार आहेत. मालिकेतील सर्व सामने सायंकाळी 7 वाजल्यापासून खेळवले जातील. भारतीय संघाची कमान सूर्याकडे… टीम इंडियाने बांगलादेशसोबत खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत अप्रतिम कामगिरी करत मालिका 2-0 अशी जिंकली. आता टी-20 मालिकेतही भारत बांगलादेशला हरवण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. टी-20 मालिकेत रोहित नव्हे तर सूर्यकुमार यादवकडे भारतीय संघाची कमान असेल. त्याचबरोबर हार्दिक पांड्या, संजू सॅमसन सारखे वरिष्ठ खेळाडूही संघात असतील. मात्र, चाहत्यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची उणीव भासणार आहे, कारण या दोघांनी 2024 च्या टी-20 विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. Women’s T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकाचा थरार आजपासून सुरू…! जाणून घ्या वेळ, तारीख आणि लाईव्ह स्ट्रिमिंगसह सर्व Details एका क्लिकवर… टीम इंडिया : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव. बांगलादेश क्रिकेट संघ : नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तनजीद हसन तमीम, परवेझ हुसैन इमॉन, तौहीद हृदोय, महमुदुल्ला, लिटन दास, झाकेर अली, मेहदी हसन मिराज, शाक मेहदी हसन, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, तंजीम हसन साकीब, रकीबुल इस्लाम.