Women’s T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकाचा थरार आजपासून सुरू…! जाणून घ्या वेळ, तारीख आणि लाईव्ह स्ट्रिमिंगसह सर्व Details एका क्लिकवर…

ICC Womens T20 World Cup 2024 : आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 आजपासून सुरू होत आहे. एकूण 18 दिवस चालणाऱ्या महिला T20 विश्वचषकात 10 संघांमध्ये 23 सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 3 ऑक्टोबरला बांगलादेश आणि स्कॉटलंड यांच्यात दुपारी 3.30 वाजता होणार आहे. तर आजच रात्री 7.30 वाजता स्पर्धेतील दुसरा सामना पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे. तर महिला T20 विश्वचषकाशी संबंधित संपूर्ण माहिती या बातमीतून जाणून घेऊया….
कोणता संघ कोणत्या गटात आहे?
बांगलादेशातील सत्तापालटानंतर परिस्थिती बिघडली तेव्हा ICC ने महिला T20 विश्वचषक 2024 UAE मध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. आजपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. टीम इंडिया ग्रुप-ए चा भाग आहे, ज्यामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका या संघांचाही समावेश आहे. तर ब गटात बांगलादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज हे संघ आहेत.
दोन्ही गटातील टॉप 2 संघ स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी पात्र होणार आहेत. पहिला उपांत्य फेरीची लढत दुबई येथे तर दुसरी उपांत्य फेरीची लढत शारजाह येथे खेळविण्यात येणार आहे. उपांत्य फेरीतील विजयी संघ 20 ऑक्टोबर रोजी दुबई येथे विजेतेपदासाठी भिडतील.
ICC Women’s T20 World Cup 2024 : ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चुका परवडणाऱ्या नाहीत – उपकर्णधार मंधाना
भारतीय महिला संघाच्या लढती…
टीम इंडिया 4 ऑक्टोबरला न्यूझीलंडसोबत स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. त्यानंतर विश्वचषक स्पर्धेतील मोठा सामना म्हणजेच भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर 6 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 वाजता होणार आहे.
4 ऑक्टोबर 2024 – भारत वि न्यूझीलंड : दुबई
6 ऑक्टोबर 2024 – भारत वि पाकिस्तान : दुबई
9 ऑक्टोबर 2024 – भारत वि श्रीलंका : दुबई
13 ऑक्टोबर 2024 – भारत वि ऑस्ट्रेलिया : शारजाह
सामने किती वाजता सुरू होतील?
महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये, दुपारचे सामने दुपारी 3.30 वाजता सुरू होतील, तर रात्रीचे सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होतील. टी-20 विश्वचषकाचे उपांत्य फेरीचे सामने 17 आणि 18 ऑक्टोबर रोजी तर अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होईल. या सर्व सामन्याची वेळ रात्री 7.30 वाजता आहे.
सामना कुठे बघायला मिळणार?
महिला T20 विश्वचषक स्पर्धेचे भारतात टीव्ही चॅनेल तसेच मोबाईल ॲप्सवर प्रक्षेपण केले जाणार आहे. टीम इंडियाचे चाहते स्टार स्पोर्ट्स चॅनलवर त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग (थेट प्रक्षेपण) पाहू शकतील. विशेष म्हणजे तुम्ही हिंदी आणि इंग्रजीसोबतच इतर अनेक भाषांमध्येही कॉमेंट्री ऐकू शकाल. जर आपण मोबाईल ॲपबद्दल बोललो तर ते डिस्ने प्लस हॉटस्टारवरही सर्व सामन्याचे थेट प्रक्षेपण असेल आणि चाहते सामन्याचा आनंद घेऊ शकतील.
𝗠𝗮𝗿𝗸 𝗬𝗼𝘂𝗿 𝗖𝗮𝗹𝗲𝗻𝗱𝗮𝗿 🗓️#TeamIndia‘s schedule for the ICC Women’s #T20WorldCup 2024 is 𝙃𝙀𝙍𝙀 🔽 pic.twitter.com/jbjG5dqmZk
— BCCI Women (@BCCIWomen) August 26, 2024
भारतीय संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तिका भाटिया (फिटनेसबदल सांशकता), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, दयालन हेमलता, आशा शोभना, राधाभाऊ श्रेयंका पाटील (फिटनेसबदल सांशकता), सजना सजीवन
ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह : उमा छेत्री (विकेटकीपर), तनुजा कंवर, सायमा ठाकोर.
नॉन ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह : राघवी बिस्त, प्रिया मिश्रा.
महिला T20 विश्वचषक 2024 : संपूर्ण वेळापत्रक
सामना 1- बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह (3 ऑक्टोबर 2024, दुपारी 3.30)
सामना 2- पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका, शारजाह (3 ऑक्टोबर 2024, संध्याकाळी 7.30)
सामना 3- दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई (4 ऑक्टोबर 2024, दुपारी 3.30)
सामना 4- भारत विरुद्ध न्यूझीलंड (4 ऑक्टोबर 2024, संध्याकाळी 7.30)
सामना 5- ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका (5 ऑक्टोबर 2024, दुपारी 3.30)
सामना 6- बांगलादेश विरुद्ध इंग्लंड (5 ऑक्टोबर 2024, संध्याकाळी 7.30)
सामना 7- भारत विरुद्ध पाकिस्तान (6 ऑक्टोबर2024, दुपारी 3.30)
सामना 8- स्कॉटलंड विरुद्ध वेस्ट इंडिज (6 ऑक्टोबर2024, संध्याकाळी 7.30)
सामना 9- इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह (7 ऑक्टोबर 2024, संध्याकाळी 7.30)
सामना 10- ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड, शारजाह (8 ऑक्टोबर2024, संध्याकाळी 7.30)
सामना 11- स्कॉटलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई (9 ऑक्टोबर 2024, दुपारी 3.30)
सामना 12- भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई (9 ऑक्टोबर 2024, संध्याकाळी 7:30)
ICC Women’s T20 World Cup 2024 : विश्वकरंडकाच्या विजेतेपदासाठी तयारी पूर्ण – हरमनप्रीत कौर
सामना 13- बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज, शारजाह (10 ऑक्टोबर 2024, संध्याकाळी 7.30)
सामना 14 – ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, दुबई (11 ऑक्टोबर 2024, संध्याकाळी 7.30)
सामना 15 – न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, शारजाह (12 ऑक्टोबर 2024, दुपारी 3.30)
सामना 16- बांगलादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुबई (12 ऑक्टोबर 2024, संध्याकाळी 7.30)
सामना 17- इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, शारजाह (13 ऑक्टोबर 2024,दुपारी 3.30)
सामना 18- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, शारजाह (13 ऑक्टोबर 2024,संध्याकाळी 7.30)
सामना 19- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, दुबई (14 ऑक्टोबर 2024, संध्याकाळी 7.30)
सामना 20- इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, दुबई (15 ऑक्टोबर 2024, संध्याकाळी 7:30)
उपांत्य फेरी सामने….
पहिला सामना : 17 ऑक्टोबर 2024, दुबई (संध्याकाळी 7:30)
दुसरा सामना : 18 ऑक्टोबर 2024, शारजाह (संध्याकाळी 7:30)
अंतिम विजेतपदासाठी सामना
20 ऑक्टोबर 2024 : दुबई (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30)





