India–Russia : सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थायी सदस्यत्वासाठी रशिया आग्रही

India–Russia : रशियाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारत, ब्राझील आणि आफ्रिकन देशांचे स्थायी सदस्यत्व हवे आहे. जागतिक संघटनेत जगातील विविधतेचे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे.
सुरक्षा परिषदेत प्रादेशिक महत्त्व असलेल्या या देशांचा समावेश करण्याची गरज बऱ्याच काळापासून जाणवत असल्याचे रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव यांनी म्हटले आहे.
एका वेबसाइटशी बोलताना लावरोव यांनी सांगितले की, भारत, ब्राझील आणि आफ्रिका या देशांचे प्रतिनिधी दीर्घकाळ सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी राहायला हवे होते. जागतिक बहुसंख्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी हे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रात भारताच्या विरोधात कायम सदस्य असलेल्या चीनने सातत्याने अडथळे निर्माण केले जात आहेत.
भारत दीर्घ काळापासून सुरक्षा परिषदेत सुधारणांची मागणी करत आहे. स्थायी व अस्थायी सदस्यांची संख्या वाढविण्याची गरज व्यक्त करत आहे. १९४५ मध्ये स्थापन झालेल्या सुरक्षा परिषदेत स्थापनेपासून १५ सदस्य आहेत.
यापैकी पाच कायमस्वरूपी आणि 10 अस्थायी आहेत. सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी सदस्यत्व मिळवण्याच्या भारताच्या दाव्याला अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने आधीच पाठिंबा दिला आहे. मात्र स्थायी सदस्यांमध्ये असलेला चीन यामध्ये अडथळे निर्माण करत आहे.
गेल्या महिन्यात ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टारमर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागेसाठी भारताला पाठिंबा दिला होता.
२०२१- २२ मध्ये भारत अखेरचा स्थायी सदस्य म्हणून यूएन हाय टेबलवर बसला होता. समकालीन जागतिक वास्तव प्रतिबिंबित करण्यासाठी स्थायी सदस्यांची संख्या वाढवण्याची मागणी वाढत आहे.
रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी भारताच्या बाजूने आवाज उठवण्याची ही पहिलीच वेळ नाही. ७९ व्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना, त्यांनी यावर जोर दिला की न्याय्य जागतिक व्यवस्थेसाठी सुरक्षा परिषदेमध्ये ग्लोबल साउथचे प्रतिनिधित्व वाढवणे आवश्यक आहे आणि त्यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागांसाठी भारत आणि ब्राझीलच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.
आम्ही पाश्चिमात्य देशांसोबतच्या चर्चेतून मागे हटत नसल्याचे लावरोव म्हणाले होते. जुलैमध्ये, रशियाच्या प्रस्तावावर, सुरक्षित, अधिक टिकाऊ जागतिक व्यवस्था निर्माण करण्याच्या विषयावर सुरक्षा परिषदेत खुली चर्चा झाली.
संयुक्त राष्ट्रांमध्ये तसेच इतर व्यासपीठांवर चर्चा सुरू होणे महत्त्वाचे आहे, असे मला वाटते. निष्पक्ष जागतिक व्यवस्थेसाठी निःसंशयपणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत ग्लोबल साउथचे विस्तारित प्रतिनिधित्व आवश्यक आहे असे लावरोव यांनी नमूद केले.





