India beat New Zealand : टीम इंडियाचा ऐतिहासिक विक्रम! २२६ धावांचे महाकाय आव्हान सर; संजू-श्रेयस अन् नमनच्या वादळात न्यूझीलंड गारद
India beat New Zealand : भारताच्या या दिमाखदार विजयात सलामीवीर संजू सॅमसन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी निर्णायक भूमिका बजावली, तर अखेरच्या षटकांत नमन धीरने अप्रतिम फलंदाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केला.

India Chase Down Historic 226 Runs Against New Zealand to Win 1st T20I in Christchurch : न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्याच लढतीत भारतीय संघाने ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. अत्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात भारताने २२६ धावांचे महाकाय आव्हान ४ गडी राखून यशस्वीरीत्या पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताने केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा यशस्वी पाठलाग ठरला आहे. या विक्रमी विजयासह भारतीय संघाने मालिकेत १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आहे. भारताच्या या दिमाखदार विजयात संजू सॅमसनसह श्रेयस आणि नमन धीरने महत्त्वाची भ
सलामी जोडीची वेगवान सुरुवात; न्यूझीलंडची २० षटकांत २२५ धावांपर्यंत मजल
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाला टिम सायफर्ट आणि फिन ॲलन यांनी आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या काही षटकांत ४९ धावा जोडल्या. सायफर्ट १७ चेंडूंत २४ धावा करून बाद झाला, तर फिन ॲलनने २४ चेंडूंत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४५ धावांची वेगवान खेळी केली. त्यानंतर डॅरिल मिचेलने १९ चेंडूंत २८ धावांचे योगदान दिले; मात्र अर्शदीप सिंगने त्याला माघारी धाडत ही भागीदारी तोडली.
ग्लेन फिलिप्सचे वादळ; ४० चेंडूंत कुटल्या नाबाद ८२ धावा –
4️⃣2️⃣* Runs
1️⃣5️⃣ Balls
2️⃣8️⃣0️⃣ Strike Rate
5️⃣ Fours & 2️⃣ SixesHow good was that match-winning finish from Naman Dhir? 👇
Scorecard ▶️ https://t.co/ADfFnxXGzz
#TeamIndia | #NZvIND https://t.co/4PgLm8Rbim
— BCCI (@BCCI) October 22, 2026
आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि बेव्हन जेकब्स यांनी भारतीय गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी अवघ्या ३२ चेंडूंत ७३ धावांची स्फोटक भागीदारी रचली. जेकब्स १६ चेंडूंत ३ षटकारांसह ३१ धावा काढून धावचीत झाला. दुसऱ्या टोकाला पाय रोवून उभ्या राहिलेल्या फिलिप्सने अवघ्या २७ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ४० चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर २०५ च्या स्ट्राईक रेटने नाबाद ८२ धावांची वादळी खेळी केली, ज्यामुळे न्यूझीलंडने ४ बाद २२५ धावांचा विशाल डोंगर उभारला.
भारतीय गोलंदाजांची धुलाई; भुवनेश्वर कुमारला चार षटकांत ४९ धावा
A flying start that made the chase possible 🫡
Scorecard ▶️ https://t.co/ADfFnxXGzz
#TeamIndia | #NZvIND | @IamSanjuSamson https://t.co/qBU50RVhrY
— BCCI (@BCCI) October 22, 2026
या सामन्यात सर्वच भारतीय गोलंदाज प्रचंड महागडे ठरले. चार वर्षांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला सूर गवसला नाही; त्याने ४ षटकांत तब्बल ४९ धावा दिल्या आणि त्याला एकही विकेट्स मिळाली नाही. अर्शदीप सिंगने ४५ धावांत १ गडी बाद केला. फिरकीपटू अक्षर पटेलने ४ षटकांत ५१ धावा देऊन १ विकेट्स मिळवली, तर नितीश कुमार रेड्डीने ४० धावा खर्च केल्या. मयंक यादवने नियंत्रित मारा करत एका फलंदाजाला तंबूत पाठवले.
२२६ धावांचा यशस्वी पाठलाग; भारताचा न्यूझीलंडविरुद्ध सर्वात मोठा विक्रम –
We are heading for a close finish ⏳
Updates ▶️ https://t.co/ADfFnxXGzz
#TeamIndia | #NZvIND https://t.co/zsb6XiT8ZU
— BCCI (@BCCI) October 22, 2026
प्रत्युत्तरात २२६ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अजिबात दबावात न येता सुरुवातीपासूनच चौफेर फटकेबाजी केली. संजू सॅमसनच्या वादळी अर्धशतकाने (६७) विजयाचा पाया रचला, तर कर्णधार श्रेयस अय्यरने (४२) संयमी खेळी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. मोक्याच्या क्षणी युवा फलंदाज नमन धीरने (४२) शानदार फटकेबाजी करत भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला आणि किवींच्या भूमीवर तिरंगा दिमाखात फडकवला.





