Simran Sharma Gold : अवघ्या ६ महिन्यांत झाला जन्म, गेली डोळ्यांची दृष्टी; भारताच्या लेकीने जपानमध्ये २ सुवर्णपदकं जिंकत रचला इतिहास
Simran Sharma Gold : गाझियाबादची सिमरन शर्मा ही T12 गटातील विश्वविजेती आणि पॅरालिम्पिक पदक विजेती पॅरा-स्प्रिंटर आहे. आशियाई पॅरा गेम्समध्ये १०० मीटर आणि २०० मीटर शर्यतीत विक्रम मोडणारी सुवर्णपदके जिंकली.

Simran Sharma Smashes Asian Para Games Records with Double Gold in Nagoya : जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई पॅरा गेम्स २०२६ मध्ये भारताची स्टार टी१२ पॅरा-स्प्रिंटर सिमरन शर्माने आपल्या अफाट वेगाने ट्रॅकवर नवा इतिहास रचला आहे. टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीमची (TOPS) खेळाडू असलेल्या सिमरनने १०० मीटर आणि २०० मीटर टी१२ अशा दोन्ही प्रकारांत सुवर्णपदकांवर नाव कोरले. विशेष म्हणजे, तिने दोन्ही स्पर्धांमध्ये नवे गेम्स रेकॉर्ड प्रस्थापित केले. महिलांच्या १०० मीटर टी१२ शर्यतीत तिने अवघ्या १२.०२ सेकंदांची विक्रमी वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले आणि हीट्समधील स्वतःचाच १२.१३ सेकंदांचा विक्रम मोडला.
जन्मतःच अंधत्व आणि गरिबी; ६ महिने इनक्यूबेटरमध्ये लढा –
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे जन्मलेल्या सिमरनचा बालपणाचा प्रवास अत्यंत वेदनादायी राहिला. तिचा जन्म वेळेआधीच अवघ्या सहाव्या महिन्यात झाल्यामुळे तिचे शरीर अत्यंत अशक्त होते. त्यामुळे पुढील सहा महिने तिला रुग्णालयातील इनक्यूबेटरमध्ये मृत्यूशी लढा द्यावा लागला. या प्रतिकूल परिस्थितीमुळे तिच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम झाला आणि दृष्टी कायमची बाधित झाली. दृष्टी नसताना आणि गरिबीशी संघर्ष करावा लागत असतानाही धावण्याच्या अफाट जिद्दीने तिला ट्रॅकवर आणले.
पती बनले मार्गदर्शक; अडचणींवर मात करत व्यावसायिक प्रशिक्षण
🇮🇳 DOUBLE GOLD & A NEW RECORD! 🥇🥇
Heartiest congratulations to Simran on securing her second Gold with a stunning New Games Record of 12.02s in the Women’s 100m T12 at the Asian Para Games 2026.
#Cheer4Bharat https://t.co/dL2lRhtJ0c
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) October 21, 2026
सिमरनच्या या यशात तिचे पती गजेंद्र सिंग यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. स्वतः लष्करात स्पोर्ट्स कोच असलेल्या गजेंद्र यांनी सिमरनमधील खेळाडू ओळखला आणि तिला व्यावसायिक स्तरावर प्रशिक्षण देणे सुरू केले. तिचा आधीचा गाईड उमर सैफी याच्यावर डोपिंगची बंदी आल्यानंतरही सिमरन खचली नाही. तिने तिचा नवा गाईड शिवम याच्यासोबत उत्तम समन्वय साधत ट्रॅकवर दमदार पुनरागमन केले आणि देशाला पदकांचा नजराणा दिला.
पॅरिस पॅरालिम्पिक पदक ते विश्वविजेतेपदाचा गौरव –
Simran Sharma has added another golden chapter to India’s sporting journey, winning her second Gold Medal at the Aichi-Nagoya 2026 Asian Para Games.
She clinched the Women’s 100m T12 title, setting a new Games Record. This remarkable performance is a moment of immense pride for the nation.
Congratulations to Simran and best wishes for continued success in the years ahead.
— Rajnath Singh (@rajnathsingh) October 21, 2026
सिमरनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अत्यंत नेत्रदीपक राहिली आहे. तिने पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये २०० मीटर प्रकारात ऐतिहासिक कांस्यपदक पटकावले होते, तर १०० मीटर प्रकारात तिने जागतिक विजेती होण्याचा मान मिळवला आहे. २०२२ च्या हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्समध्ये तिने १०० आणि २०० मीटरमध्ये रौप्यपदके जिंकली होती; मात्र २०२६ च्या नागोया गेम्समध्ये तिने त्या दोन्ही पदकांचे रूपांतर विक्रमी सुवर्णपदकांमध्ये करून दाखवले.
स्वतःच्या वेळेत मोठी सुधारणा; भारताची सुवर्णकन्या –
२०२२ च्या हांगझोऊ गेम्सच्या तुलनेत सिमरनने आपल्या वेळेत प्रचंड सुधारणा केली आहे. १०० मीटरमध्ये तिने १२.६८ सेकंदांवरून १२.०२ सेकंदांपर्यंत वेळ कमी करत तब्बल ०.६६ सेकंदांची सुधारणा नोंदवली. तर २०० मीटरमध्ये २६.१२ सेकंदांच्या तुलनेत २४.८० सेकंदांची वेळ काढत १.३२ सेकंदांचा फरक पाडला. तिच्या या सातत्यपूर्ण प्रगतीने भारताला जागतिक पातळीवर नवा गौरव मिळवून दिला आहे.





