भारताने रशियाकडून खरेदी केले दीड लाख कोटीचे क्रूड

नवी दिल्ली – रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून कोणत्या देशाने रशियाकडून किती इंधन खरेदी केले याचे मूल्यांकन युरोपातील काही संशोधन संस्था करीत आहेत. या मूल्यांकनानुसार या कालावधीत भारताने रशियाकडून 112.5 अब्ज युरोचे म्हणजे 1.5 लाख कोटी रुपयाचे इंधन खरेदी केले आहे.
सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एयर या संस्थेने ही माहिती जारी केली. रशियाकडून इंधन खरेदीत चीन सर्वात पुढे आहे. या कालावधीत चीनने रशियाकडून 235 अब्ज युरोचे इंधन खरेदी केले आहे. या कालावधीत रशियाला इंधन विक्रेतेतून तब्बल 835 अब्ज डॉलर मिळाले आहेत.
विविध देशांनी रशियाकडून इंधन खरेदी करू नये यासाठी अमेरिकेने बर्याच मर्यादा आणल्या होत्या. मात्र तरीही बर्याच देशानी रशियाकडून इंधन खरेदी केले आहे. आता अमेरिकेने अधिक मर्यादा आणल्या असल्यामुळे इंधन खरेदी मंदावली आहे. रशियातील तेल कारखान्याबरोबरच हे तेल वाहून नेणार्या जहाजावरही बंदी आणले आहे. त्यामुळे खनिज तेल विक्री मंदावली आहे.
भारत आपल्या गरजेच्या 85 टक्के खनिज तेल आयात करतो आणि जगात खनिज तेल आयात करणारा तिसर्या क्रमांकाचा देश आहे. भारताने खनिज तेल आयातीसाठी 2022 मध्ये 232.7 अब्ज डॉलर खर्च केले. 2023 मध्ये ही रक्कम 234 अब्ज डॉलर होती. तर 2025 मध्ये आतापर्यंत 195.2 अब्ज डॉलर खर्च करण्यात आले आहेत.
एक टक्क्यावरून 40% वर
युद्धापूर्वी भारत रशियाकडून केवळ गरजेच्या केवळ एक टक्के खनिज तेल आयात करीत होता. इतर खनिज तेल मध्यपूर्व देशातून आयात केले जात होते. मात्र युद्धानंतर भारताच्या एकूण खनिज तेल आयातीत रशियाकडून झालेली आयात 40 टक्कयावर गेली आहे.





