Weather Update : देशभरात अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. एकीकडे सूर्य चांगलाच तापला असताना दुसरीकडे हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये तापमान हे 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. (Weather Update) पुढील काही दिवस उष्णतेच्या झळा अशाच सहन कराव्या लागणार असल्याचे इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच, दुपारी 12 ते 4 या वेळेत लोकांनी घरातच राहावे, असा सल्लाही त्यांच्याकडून देण्यात आला आहे. (Weather Update) भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) उत्तर, मध्य आणि पूर्व भारतातील अनेक भागांसाठी तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला. पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील काही भागांमध्ये तापमान आधीच 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. (Weather Update) जेव्हा तापमान सामान्य तापमानापेक्षा किमान 4.5 अंश सेल्सिअसने जास्त होते, तेव्हा उष्णतेची लाट जाहीर केली जाते. सध्या अनेक ठिकाणी ही मर्यादा ओलांडली असल्याचे समोर आले आहे. (Weather Update) तसेच, राजस्थान आणि ओडिशामध्येही उष्णतेची लाट शिगेला पोहोचली आहे. या आठवड्यात विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हे सर्वात उष्ण राज्य राहतील. राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्येही कडक ऊनाचा फटका बसले. ओडिशा, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि पूर्व किनारपट्टीवरील तामिळनाडूमध्ये उष्णता आणि आर्द्रतेमुळे जीवन कठीण झाले आहे. जास्त आर्द्रतेमुळे घामाचे बाष्पीभवन होत नाही, त्यामुळे तापमान प्रत्यक्षात आहे त्यापेक्षा खूप जास्त जाणवते. (Weather Update) आयएमडीच्या मते, ही तीव्र उष्णता किमान 22 एप्रिलपर्यंत कायम राहणार असून पूर्व उत्तर प्रदेशात 20 एप्रिलच्या आसपास काहीसा दिलासा मिळू शकतो. तसेच, विदर्भ आणि मध्य भारतातील तापमान काही प्रमाणात कमी होऊ शकते. (Weather Update)