India U20 Medals : भारतीय नौदलाच्या जवानाची जागतिक पातळीवर गरुडझेप! २.२१ मीटरची उंच उडी मारत मिळवले ऐतिहासिक रौप्य पदक
India U20 Medals : वर्ल्ड ॲथलेटिक्स अंडर-२० चॅम्पियनशिपमध्ये बसंत कुमार मेघवालने उंच उडीत रौप्य पदक जिंकून नवीन विक्रम प्रस्थापित केला, तर शाहनवाझ खानने लांब उडीत कांस्य पदक पटकावले.

World Athletics U20 Championships Basant Kumar Meghwal Wins Silver Medal : भारताच्या युवा ॲथलीट्सनी जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करत ‘वर्ल्ड ॲथलेटिक्स अंडर-२० चॅम्पियनशिप’मध्ये एकाच दिवशी दोन पदके जिंकून तिरंगा फडकवला आहे. राजस्थानच्या १९ वर्षीय बसंत कुमार मेघवाल (Basant Kumar Meghwal) याने पुरुषांच्या हाय जंपमध्ये (उंच उडी) रौप्य पदक (Silver Medal) जिंकून इतिहास रचला, तर शाहनवाझ खानने (Shahnawaz Khan) लाँग जंपमध्ये (लांब उडी) कांस्य पदकावर (Bronze Medal) नाव कोरले.
हाय जंपमध्ये मेडल जिंकणारा बसंत पहिला भारतीय!
राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील अनुपगढचा रहिवासी आणि भारतीय नौदलाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बसंत कुमारने २.२१ मीटरची उंच उडी मारत आपले वैयक्तिक सर्वोत्तम प्रदर्शन केले. या चॅम्पियनशिपच्या इतिहासात हाय जंपमध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.या स्पर्धेत अल्जेरियाच्या युनेस अयाचीने सुवर्ण तर ग्रेट ब्रिटनच्या ओटिस पूलने कांस्य पदक जिंकले.
विशेष म्हणजे, या तिन्ही ॲथलीट्सनी २.२१ मीटरचे अंतर पार केले होते आणि २.२४ मीटरचा टप्पा तिघांनाही पार करता आला नाही. अखेर ‘काउंटबॅक’ नियमानुसार, पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या अयाचीला गोल्ड, दुसऱ्या प्रयत्नात यश मिळवणाऱ्या बसंतला सिल्व्हर आणि तिसऱ्या प्रयत्नातील ओटिसला ब्रॉन्झ मेडल देण्यात आले.
Basant has soared to a historic Silver Medal in Men’s High Jump at the World Athletics U20 Championships 2026 in Oregon, USA! 🏟️
Clearing an impressive 2.21m, Basant narrowly missed out on Gold on countback — but secured his place in the history books as the first Indian to win… pic.twitter.com/WeQpUFw0xr
— SAI Media (@Media_SAI) August 9, 2026
शाहनवाझ खानची लाँग जंपमध्ये गरुडझेप!
Shahnavaz Khan has made history at the World Athletics U20 Championships 2026 in Oregon, USA, winning Bronze in Men’s Long Jump with a superb 7.84m leap! 🏟️👏
This marks India’s first-ever medal in Men’s Long Jump at a World-level event! 🇮🇳🥉
A historic jump. A landmark moment.… pic.twitter.com/PpEPq9PnWI
— SAI Media (@Media_SAI) August 9, 2026
बसंतच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर १८ वर्षीय शाहनवाझ खानने पुरुषांच्या लाँग जंपमध्ये ७.८४ मीटर लांब उडी मारत भारताला तिसरे पदक मिळवून दिले. त्याने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात हा टप्पा गाठला. इटलीच्या डॅनिएले इंजोलीने (७.९७ मीटर) गोल्ड तर ऑस्ट्रेलियाच्या मेसन मॅकग्रोडरने (७.९६ मीटर) सिल्व्हर मेडल जिंकले. या स्पर्धेत भारताचा आर. सी. जितिन अर्जुनन ७.५९ मीटरच्या उडीसह आठव्या स्थानावर राहिला.
याआधी ७ ऑगस्ट रोजी भारताच्या आशिष यादवने भालाफेक (Javelin Throw) स्पर्धेत रौप्य पदक जिंकून भारताचे खाते उघडले होते. नीरज चोप्रानंतर अशी कामगिरी करणारा तो केवळ दुसरा भारतीय ठरला आहे.





