IND vs AUS 4th Test : मेलबर्न कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाची प्लेइंग-11 ची घोषणा, संघात केले दोन मोठे बदल…

IND vs AUS 4th Test (Melbourne) | ऑस्ट्रेलियाने बॉक्सिंग डे कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी गुरुवार (26 डिसेंबर)पासून खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची ही चौथी कसोटी असेल. या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने अतिशय मनोरंजक प्लेइंग इलेव्हन जाहीर केले आहे. कांगारूंच्या संघात 19 वर्षीय खेळाडूचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय ट्रॅव्हिस हेड पूर्णपणे तंदुरुस्त आहे तर गाबा कसोटीत विराट कोहलीला बाद करणारा जोश हेझलवूड संघाबाहेर झाला आहे.
JUST IN: Australia’s XI for the Boxing Day blockbuster is locked in | @LouisDBCameron #AUSvIND https://t.co/uILWQn8JJl
— cricket.com.au (@cricketcomau) December 24, 2024
दोन महत्वपूर्ण बदल…
ऑस्ट्रेलियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. नॅथन मॅकस्विनीच्या जागी 19 वर्षीय सॅम कोन्स्टासला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवण्यात आले आहे. मॅकस्विनी हा शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाचा भाग नाही. गोलंदाजी विभागात जोश हेझलवूडच्या जागी स्कॉट बोलँडला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. बोलँडने ॲडलेडमध्ये संघासाठी गुलाबी चेंडूची कसोटीही खेळली होती, ज्यामध्ये त्याने शानदार गोलंदाजी करत 5 बळी घेतले होते.
ट्रॅव्हिस हेडला ग्रीन सिग्नल …
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज आणि मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या ट्रेव्हिड हेडला फिटनेसच्या बाबतीत ग्रीन सिग्नल मिळाला आहे. हेडने बॉक्सिंग डे कसोटीसाठी फिटनेस चाचणी उत्तीर्ण केली आहे. हेडने मालिकेत सलग दोन शतके झळकावली आहेत. हेडने ॲडलेडमध्ये 140 आणि ब्रिस्बेनमध्ये 152 धावांची शानदार खेळी खेळली होती.
कर्णधार पॅट कमिन्सने पत्रकाराशी बोलताना सांगितले की, “हेड मेलबर्न कसोटीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. हेडचा फिटनेस ऑस्ट्रेलियासाठी वरदान ठरेल आणि टीम इंडियासाठी मोठी समस्या असेल.”
IND vs AUS 4th Test : विराट मेलबर्न कसोटीपासून दमदार पुनरागमन करेल – कर्णधार शर्मा
बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचे प्लेइंग इलेव्हन…
उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टन्स, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.





