भारत व श्रीलंका टी-20 सामना पुण्यात रंगणार; 5 जानेवारीच्या सामन्याची उद्यापासून तिकिटविक्री

पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे भारत आणि श्रीलंका यांच्यातील आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना येत्या 5 जानेवारीला पुण्यात होणार आहे. तब्बल 22 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर नवीन वर्षात होत असलेल्या या सामन्याच्या तिकिट विक्रीस आजपासून (मंगळवार) सुरूवात होत आहे.
#RanjiTrophy । महाराष्ट्राचा उद्यापासून आंध्र प्रदेशशी सामना; ऋतुराजच्या कामगिरीवर लक्ष
एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयोजित होत असलेला हा चौथा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना ठरणार असून तेरावा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना ठरणार आहे. एमसीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आत्तापर्यंत 2 आंतरराष्ट्रीय कसोटी, 7 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि 3 आंतरराष्ट्रीय टी-20 तसेच 51 इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) सामन्यांचे आयोजन केले गेले आहे, अशी माहिती महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे सचिव रियाज बागवान यांनी दिली.
उद्यापासून तिकिट विक्री
या सामन्याची तिकीटे क्रिकेटप्रेमी ऑनलाईन उपलब्ध असणार आहे. तसेच सामन्याची प्रत्यक्ष (बॉक्स ऑफिस) तिकीटविक्री पीवायसी हिंदू जिमखाना, भांडारकर रोड आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गहुंजे येथे होणार आहे. या दोन्ही ठिकाणांवरील बॉक्स ऑफिस सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत खुले असणार आहेत.
ईस्ट स्टॅंड आणि वेस्ट स्टॅंड ः 800 रुपये, साऊथ अप्पर 1100 रुपये, साऊथ लोअर ः 2000 रुपये, साऊथ वेस्ट आणि साऊथ ईस्ट स्टॅंड ः 1750 रुपये, नॉर्थ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट स्टॅंड ः 1750 रुपये, नॉर्थ स्टॅंड ः 2000 रुपये, साऊथ पॅव्हेलियन ए आणि बी स्टॅंड ः 3500 रुपये, कॉर्पोरेट बॉक्स (12 व्यक्तींची आसनक्षमता) तिकीट 6,00,000 रुपये.





