Chakda Express – भारतात क्रिकेटला सर्वात जास्त चाहता वर्ग असून या खेळाबाबत लोकांचं प्रेम अनेकवेळा पाहायला मिळालाय. क्रिकेटच्या लोकप्रियतेमुळे भारतीय खेळाडूंवर चित्रपट देखील बनवण्यात आले आहेत. मागील काही काळापासून चर्चेत असलेल्या ‘चकडा एक्सप्रेस’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. हा चित्रपट भारताची माजी दिग्गज क्रिकेटपटू झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर आणि तिच्या कारकिर्दीवर बनवण्यात आला आहे. यामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याने अनुष्का शर्माने काही खास फोटो आपल्या इंस्टाग्राम खात्यावरून शेअर केले आहेत.
शूटिंगच्या शेवटच्या दिवशीचे काही फोटो अनुष्काने शेअर केले आहेत. यामध्ये झुलनही शूटिंगच्या सेटवर उपस्थित असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर या आनंदाच्या क्षणी केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी अनुष्काने भारतीय महिला क्रिकेट संघाची जर्सी घातलेली होती. याव्यतिरिक्त चित्रपटाशी संबंधित इतर काही लोकही उपस्थित होते. अनुष्काने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की,”चकडा एक्सप्रेसचे शूटिंग पूर्ण झाले आहे. शूट पूर्ण करण्यासाठी शेवटचा क्लॅप दिल्याबद्दल झुलन गोस्वामीचे आभार.”
View this post on Instagram
झुलन गोस्वामीची कारकीर्द
40 वर्ष असलेल्या झूलनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कारकीर्द दमदार राहिली. तिने अनेक प्रसंगी संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. तिच्या कामगिरीमुळे आज ती अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्त्रोत बनली आहे. झूलनने आपल्या कारकिर्दीत 12 कसोटी सामन्यात 44 विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर 204 एकदिवसीय सामन्यात 255 तर 68 टी-20 सामन्यात असून 56 गडी बाद केले आहेत.