India Warm Up : टीम इंडियाच्या सराव सामन्यांसाठी ‘इंडिया ए’ सज्ज! आयुष बडोनीकडे नेतृत्व, तर स्टार फलंदाजाचे संघात कमबॅक
India Warm Up : टी-२० विश्वचषक २०२६ पूर्वी सरावासाठी बीसीसीआयने इंडिया ए संघाची घोषणा केली.

India warm up matches for T20 World Cup 2026 : भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणाऱ्या १० व्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे काउंटडाऊन सुरू झाले आहे. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या मुख्य स्पर्धेपूर्वी भारतीय संघ ३ सराव सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे, यातील २ सराव सामन्यांसाठी बीसीसीआयने (BCCI) ‘इंडिया ए‘ संघाची घोषणा केली असून, युवा खेळाडू आयुष बडोनी याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
तिलक वर्माचे कमबॅक; रियान परागलाही संधी –
बीसीसीआयने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरून १५ सदस्यीय संघाची माहिती दिली. यामध्ये सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिलक वर्माचे पुनरागमन. रणजी ट्रॉफी दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तिलकला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागले होते. आता तो पूर्णपणे तंदुरुस्त असून मुख्य वर्ल्ड कप संघाचा भाग होण्यापूर्वी सराव सामन्यात आपली लय शोधण्याचा प्रयत्न करेल.
तसेच, अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त असल्याने रियान परागसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे. नुकत्याच झालेल्या शस्त्रक्रियेनंतर रियान आता मैदानावर परतला असून, अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर तो मुख्य संघ निवडीसाठी दावा मजबूत करू शकतो.
Presenting India A squad for the warm-up matches ahead of the ICC Men’s T20 World Cup 2026. India A will play two warm-up matches against USA and Namibia.
🙌Note: Tilak Varma will feature in one warm-up match before joining #TeamIndia for the #T20WorldCup pic.twitter.com/LIVpMvI6v6
— BCCI (@BCCI) February 2, 2026
सराव सामन्यांचे स्वरूप आणि वेळापत्रक –
भारतीय संघाच्या एकूण ३ सराव सामन्यांपैकी मुख्य संघ (सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील) फक्त १ सामना खेळणार आहे. उर्वरित २ सामन्यांत ‘इंडिया ए’ संघ मैदानात उतरेल.
सराव सामन्यांचे वेळापत्रक:
तिलक वर्मा यांचे पुनरागमन
२ फेब्रुवारी: इंडिया ए विरुद्ध युएसए (USA)
४ फेब्रुवारी: टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका (मुख्य संघ)
६ फेब्रुवारी: इंडिया ए विरुद्ध नामिबिया
हेही वाचा – ICC Walkover Rules : मैदानात न उतरताच भारत जिंकणार? पाकिस्तानच्या बहिष्कारावर ‘आयसीसी’चा मोठा इशारा; काय सांगतो नियम?
सराव सामन्यांसाठी ‘इंडिया ए’ संघ:
आयुष बडोनी (कर्णधार), तिलक वर्मा, रियान पराग, रवी बिश्नोई, नमन धीर, आशुतोष शर्मा, प्रियांश आर्या, एन. जगदीशन (विकेटकीपर), उर्विल पटेल (विकेटकीपर), मानव सुथार, अशोक शर्मा, गुरजपनीत सिंह, विपरज निगम, खलील अहमद आणि मयंक यादव.





