IND vs SA : तिलक वर्माने नॉर्खियाला ठोकला मॉन्स्टर सिक्स! चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर, पाहा VIDEO

तिलकने ठोकलेला षटकार गेला थेट स्टेडियम बाहेर!
तिलक वर्माने भारतीय डावाच्या १० व्या षटकात हा उत्तुंग षटकार लगावला. दक्षिण आफ्रिकेकडून हे षटक एनरिक नॉर्खिया टाकत होता. नॉर्खियाच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्माने दमदार शॉट मारला आणि चेंडू थेट स्टेडिमच्या बाहेर गेला, जो ८९ मीटर लांबीचा होता. अशा प्रकारे कटक येथे खेळल्या गेलेल्या या टी-२० सामन्यात तिलक वर्माने ३२ चेंडूत २६ धावा काढून तो बाद झाला. या खेळीत त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला. तिलकच्या या एकमेव षटकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Sound 🔛 for this one! 🔊🔊
A terrifying hit from #TilakVarma and the ball sails over the roof of the stadium. 🏟#INDvSA, 1st T20I, LIVE NOW 👉 https://t.co/tqu4j7Svcm pic.twitter.com/Xf96CwC3AB
— Star Sports (@StarSportsIndia) December 9, 2025
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पार केला १००० धावांचा टप्पा –
या खेळीदरम्यान तिलक वर्माने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १००० धावांचा टप्पा देखील पार केला आहे. या सामन्यापूर्वी तिलक १००० टी-२० धावा पूर्ण करण्यापासून फक्त ४ धावा दूर होता. आज त्याने आपल्या खेळीत ४ धावा काढताच हा पराक्रम केला. तिलक वर्माने केवळ ३४ डावांमध्ये हा टप्पा गाठला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो १३ वा भारतीय फलंदाज ठरला आहे.
टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज अपयशी –
कटक टी-२० मध्ये टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. शुबमन गिल २ चेंडूत ४, कर्णधार सूर्यकुमार यादव ११ चेंडूत १२, तर अभिषेक शर्मा १२ चेंडूत १७ धावा काढून बाद झाले. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या अक्षर पटेलने २१ चेंडूत २३ धावांचे योगदान दिले. गिल वगळता उर्वरित फलंदाजांना सुरुवात मिळाली, पण त्यांना त्याचे मोठ्या धावसंख्येत रूपांतर करता आले नाही. मात्र, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या हार्दिकने अवघ्या २८ चेंडूंत ५९ धावांची नाबाद खेळी साकारत टीम इंडियाला १७५ धावांचा टप्पा गाठून दिला. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा डाव १२.३ षटकांत ७४ धावांवर गारद झाला.





