IND W vs WI W 3rd ODI : क्लीन स्वीपसाठी टीम इंडिया सज्ज, विंडीजविरूध्दच्या मालिकेतील अखेरचा वनडे सामना आज….

India Women vs West Indies Women 3rd ODI : – शुक्रवारी होणाऱ्या तिसऱ्या व शेवटच्या महिला एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत करताना मालिका 3-0 अशी जिंकण्यासाठी भारतीय महिला प्रयत्नशील असतील. बलाढ्य ऑस्ट्रेलिया समोर मालिका गमावल्यानंतर भारताने मायदेशात खेळताना वेस्ट इंडिज संघाला टी-20 मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत देखील भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकण्यासाठी भारतीय महिला खेळाडू उत्सुक असतील.
𝗙𝗶𝗻𝗮𝗹 𝗢𝗗𝗜 𝗧𝗼𝗺𝗼𝗿𝗿𝗼𝘄 👊
📍Vadodara
🆚 West Indies
⏰ 9:30 AM IST
💻📱https://t.co/EbzsAv1VwI#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/uGhacemyF2— BCCI Women (@BCCIWomen) December 26, 2024
भारताने पाहिल्या दोन्ही लढतीमध्ये 300 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये सलामीवीर स्मृती मंधाना व हरलीन देओल यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या हरलीन देओलने एकदिवसीय लढतीत पहिले शतक झळकावले होते. याचबरोबरीने प्रतिका रावलने देखील दुसऱ्या लढतीत दमदार प्रदर्शन करताना अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळे या लढतीमध्ये तिच्याकडून देखील दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने देखील तंदुरुस्त झाल्यापासून चांगली फलंदाजी केली असली तरी तिला अजून मोठी खेळी करण्यात यश मिळालेले नाही. मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली असल्याने, तिच्यावर कोणतेही दडपण असणार नाही. त्यामुळे तिला तिचा नैसर्गिक खेळ करता येवू शकतो. गोलंदाजीमध्ये रेणुका सिंग, प्रिया मिश्रा यांनी तितास साधू यांनी प्रभावित केले आहे. त्या सातत्याने बळी टिपत आहेत, ही संघासाठी चांगली बाब आहे. अंतिम लढतीत तनुजा कंवर आणि तेजल हसनबीस यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे.
IND W vs WI W 2nd ODI : टीम इंडियानं विंडीजचा 115 धावांनी उडवला धुव्वा, मालिकेतही घेतली अजेय आघाडी..
भारत आणि वेस्टइंडिजचे संघ खालीलप्रमाणे….
भारत : स्मृती मंधाना, प्रतिका रावल, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टिरक्षक), दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, तितास साधू, रेणुका ठाकूर सिंग, प्रिया मिश्रा, उमा चेत्री, मिन्नू मणी, तेजल हसबनीस , तनुजा कंवर.
वेस्ट इंडिज : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, रशादा विल्यम्स, डिआंड्रा डॉटिन, नेरिसा क्राफ्टन, शेमेन कॅम्पबेले (यष्टिरक्षक), आलिया ॲलेने, झैदा जेम्स, करिश्मा रामहारक, शमिलिया कोनेल, अफ्लाय फ्लेचर, शबिका गजनाबी, चिनेले मॅनडी हेन्री , अश्मिनी मुनिसार.





