IND W vs WI W 1st ODI : महिला क्रिकेटमध्ये हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास, ‘अशी’ कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय कर्णधार…

IND W vs WI W 1st ODI (Harmanpreet Kaur Record) : महिला क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. वडोदरा वनडेमध्ये टीम इंडिया नव्या जर्सीत दिसली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना दमदार कामगिरी करत 50 षटकात 9 बाद 314 धावा केल्या. यादरम्यान स्मृती मंधानाने 91 धावांची खेळी केली तर कर्णधार हरमनप्रीतने 34 धावांची छोटी आणि महत्त्वाची खेळी खेळली. या खेळीत तिने एक खास विक्रम आपल्या नावावर केला.
हरमनप्रीतने कर्णधार म्हणून केली ‘ही’ कामगिरी….
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. हरमनप्रीतने वडोदरा येथील एकदिवसीय सामन्यात भारताकडून 23 चेंडूंचा सामना करत 34 धावा केल्या. तिच्या खेळीत 3 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता. यासह कर्णधार म्हणून तिने वनडेमध्ये 1012 धावा पूर्ण केल्या आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून 1000 किंवा त्याहून अधिक धावा करणारी हरमनप्रीत कौर ही 10वी भारतीय फलंदाज ठरली आहे. पुरुष क्रिकेटमध्ये एमएस धोनी, विराट कोहली, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि कपिल देव यांनी ही कामगिरी केली आहे. महिलांच्या क्रिकेटमध्ये मिताली राजनंतर ही कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
🚨 Milestone Alert 🚨
1⃣0⃣0⃣0⃣ ODI runs (and counting) as Captain! 👏 👏
Well done, Harmanpreet Kaur 👍 👍
Live ▶️ https://t.co/OtQoFnoAZu#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/K7vGsZmg0D
— BCCI Women (@BCCIWomen) December 22, 2024
एकदिवसीय सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे…
एमएस धोनी : 200 सामन्यात 6,641 धावा
विराट कोहली : 95 सामन्यात 5449 धावा
मिताली राज : 155 सामन्यात 5319 धावा
मोहम्मद अझरुद्दीन : 174 सामन्यात 5239 धावा
सौरव गांगुली : 146 सामन्यात 5082 धावा
राहुल द्रविड : 79 सामन्यात 2658 धावा
सचिन तेंडुलकर : 73 सामन्यात 2454 धावा
रोहित शर्मा : 48 सामन्यात 2204 धावा
कपिल देव : 74 सामन्यात 1564 धावा
हरमनप्रीत कौर : 26 सामन्यात 1012 धावा
U23 State A Trophy | तब्बल 20 षटकार अन् 13 चौकार… IPL 2025 आधी समीर रिझवीने ठोकलं झंझावती द्विशतक…
सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत….
महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत हरमनप्रीतने जगातील अनेक महान खेळाडूंना मागे टाकले आहे. हरमनने आतापर्यंत खेळलेल्या 139 सामन्यांमध्ये 3 हजार 749 धावा केल्या आहेत. या कालावधीत तिने 6 शतके आणि 19 अर्धशतके लगावली आहेत. सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत ती 19 व्या क्रमांकावर पोहचली आहे. यासह हरमनप्रीतने वेस्ट इंडिजची खेळाडू डिआंड्रा डॉटिन आणि इंग्लंडची नॅट सायव्हर ब्रंट यांना मागे टाकले आहे. डॉटिनने 3 हजार 735 धावा तर ब्रंटनं 3 हजार 696 धावा केल्या आहेत.
दरम्यान, भारतीय संघाने याआधी 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-1 ने पराभव केला होता. मात्र, आता दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत आमनेसामने आहेत. यानंतर 24 डिसेंबर रोजी दोन्ही संघ दुसऱ्या वनडेसाठी आमनेसामने येतील.





