IND W vs WI W 2nd ODI : टीम इंडियानं विंडीजचा 115 धावांनी उडवला धुव्वा, मालिकेतही घेतली अजेय आघाडी..

IND W vs WI W 2nd ODI : भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मंगळवारी शानदार विजयाची नोंद केली. या सामन्यात भारतानं हरलीन देओलची शानदार शतकी खेळी आणि त्यानंतर प्रिया मिश्रासह इतर गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 115 धावांनी पराभव केला. यासह भारताने तीन सामन्याच्या वनडे मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. शतकवीर हरलीन देओल सामन्याची मानकरी ठरली.
A fairly comfortable win for India, as they take an unassailable 2-0 lead in the series 🏆https://t.co/R7CzzioJ6N | #INDvWI pic.twitter.com/nigt7wiyPz
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 24, 2024
भारताने प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात 358 धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघ 46.2 षटकात 243 धावांवर गारद झाला. वेस्ट इंडिजकडून कर्णधार हेली मॅथ्यूजने शानदार शतक झळकावले. तिने 109 चेंडूत 106 धावा केल्या. याशिवाय एकाही खेळाडूला 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. परिणामी वेस्ट इंडिजचा संघ धावसंख्येचा पाठलाग करण्यात अपयशी ठरला. भारताकडून गोलंदाजीत प्रिया मिश्राने सर्वाधिक 3 बळी घेतले. याशिवाय दीप्ती शर्मा, तीतस साधू आणि प्रतिका रावल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
तत्पूर्वी, या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. भारतीय संघाने 50 षटकांत 5 गडी गमावून 358 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती आणि यासह टीम इंडियाने वनडेतील सर्वात मोठ्या धावसंख्येची बरोबरी केली. याआधी संघाने 2017 मध्ये आयर्लंडविरुद्ध दोन गडी गमावून 358 धावा केल्या होत्या.
या दरम्यान भारतीय फलंदाज हरलीन देओलने स्फोटक कामगिरी करत शतक झळकावले. तिने 103 चेंडूंचा सामना करत 115 धावांची खेळी खेळली. यादरम्यान हरलीन देओलने एकूण 16 चौकार मारले आणि 111.65 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. हरलीनच्या दमदार खेळीमुळे टीम इंडियाने 350 धावांचा टप्पा पार केला. तिच्यासोबत प्रतिका रावल आणि स्मृती मानधना यांनीही चांगली फलंदाजी केली.
तिच्यासोबत प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना यांनीही चांगली फलंदाजी केली. प्रतिकानं 86 चेंडूत 10 चौकार अन् 1 षटकारासच्या मदतीने 76 तर स्मृतीने 47 चेडूंत 7 चौकार अन् 2 षटकारासह 53 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त जेमिमाह रॉड्रिग्सनं (36 चेडूंत 52), कर्णधार हरमनप्रीत कौरनं (18 चेडूंत 22) धावांचे योगदान दिले. तर ऋचा घोष 13 आणि दीप्ति शर्मा 4 धावा करून नाबाद राहिली. वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत जेडा जेम्स, डिआंड्रा डॉटिन, कियाना जोसेफ आणि ॲफी फ्लेचर यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.





