Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियाचा लंकेविरूध्द फलंदाजीचा निर्णय..! ‘करो या मरो’च्या लढतीसाठी ‘अशी’ आहे दोन्ही संघाची Playing 11…

Women’s T20 World Cup 2024 (IND vs SL, Playing 11 Update) : महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय संघाचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. या सामन्यात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून उपांत्य फेरीसाठी आपले स्थान मजबूत करण्याचे लक्ष्य ठेवणार आहे.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा कौल हा भारतीय संघाच्या बाजूनं लागला आहे. महिला T20 विश्वचषक स्पर्धेत तिसरा सामना खेळत असलेल्या भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक (Toss) जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Harmanpreet wins the toss and India will bat first in Dubai) त्यामुळे श्रीलंकेच्या संघाला प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरावं लागेल. कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितले की, टीम इंडियाने कोणताही बदल न करता या सामन्यात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर दुसरीकडे श्रीलंकेच्या संघात एक बदल करण्यात आलेला आहे. हसिनी परेराला विश्रांती देण्यात आली आहे. तिच्या जागी अमा कांचना हिला स्थान मिळाले आहे.
India won the toss and will bat first against Sri Lanka 🏏
Follow the #INDvSL live report 📝⬇️#T20WorldCup #WhateverItTakeshttps://t.co/Kbuv2EC8Bx
— T20 World Cup (@T20WorldCup) October 9, 2024
दोन्ही संघाची Playing 11 खालीलप्रमाणे –
भारत : शेफाली वर्मा, स्मृति मंधाना, जेमिमा रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (c), ऋचा घोष (wk), दीप्ति शर्मा, सजीवन सजना, अरुंधति रेड्डी, श्रेयंका पाटिल, आशा शोभना, रेणुका ठाकुर सिंह.
श्रीलंका : विशमी गुणारत्ने, चामरी अट्टापट्टू (C), हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, नीलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (wk), अमा कंचना, सुगंधिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, उदेशिका प्रबोधनी, इनोका राणावीरा.
दरम्यान, भारतीय संघाला पहिल्या महिला टी-20 विश्वकरंडक लढतीत फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे न्यूझीलंड संघाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या लढतीत देखील धावांचा पाठलाग करताना भारताचे फलंदाज ढेपाळले असले तरी भारताने कसाबसा विजय मिळविला होता. याचा परिमाण जिंकून देखील भारताला नेटरनरेट मध्ये मोठा फटका बसला. त्यामुळे आता होणाऱ्या श्रीलंकेबरोबरच्या लढतीमध्ये भारताला मोठा विजय मिळवणे गरजेचे आहे.
श्रीलंका संघ पहिल्या दोन सामन्यात पराभूत झाला असला तरी त्याला कमकुवत समजणे चुकीचे ठरणार आहे. श्रीलंका संघाने ऑगस्ट महिन्यात झालेल्या आशियाई करंडक स्पर्धेच्य अंतिम लढतीत भारताला पराभूत केले होते. त्यामुळे या लढतीत भारताला सावध खेळताना मोठा विजय साकारावा लागणार आहे, ज्यामुळे भारताचा नेट रनरेटमध्ये सुधारणा होईल.





