IND vs BAN 2nd T20 : बांगलादेशचा भारताविरूध्द गोलंदाजीचा निर्णय, दुसऱ्या टी-20 साठी ‘अशी’ आहे दोन्ही संघाची Playing 11…

IND vs BAN 2nd T20 (Playing XI Update) : भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने ग्वाल्हेर येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 मध्ये 7 विकेट्सने विजय मिळवला. अशा स्थितीत आता सूर्यकुमार यादव दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करत आहे.
दुसरीकडे, बांगलादेशी कर्णधार हा सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा बांगलादेश संघाच्या बाजूनं लागला आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतीय संघाला प्रथम फलंदाजासाठी मैदानात उतरावं लागेल.
🚨 Toss Update 🚨
Bangladesh win the toss in the 2nd T20I and elect to bowl in Delhi.
Live – https://t.co/Otw9CpO67y#TeamIndia | #INDvBAN | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/3OMaARLaQ0
— BCCI (@BCCI) October 9, 2024
या सामन्यासाठी बांगलादेशने संघात एक बदल केला आहे. पाहुण्या संघात शौरीफुल इस्लामच्या जागी साकिबचा समावेश करण्यात आला आहे. दुसरीकडे, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक दरम्यान सांगितले की, भारतीय संघाने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.
IND vs BAN : दोन्ही संघाची प्लेइंग 11 खालीलप्रमाणे…
भारत : संजू सैमसन (Wk), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (C), नीतीश रेड्डी, हार्दिक पांड्या, रियान पराग, रिंकू सिंह, वाशिंगटन सुंदर, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह, मयंक यादव.
बांग्लादेश : परवेज हुसैन इमोन, लिटन दास (wk), नजमुल हुसैन शांतो (C), तौहीद ह्रदोय, महमूदुल्लाह, जाकिर अली, मेहदी हसन मिराज, रिशाद हुसैन, तस्कीन अहमद, तंजिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत भारतीय संघाने 14 सामने जिंकले आहेत. तसेच बांगलादेशने केवळ 1 सामना जिंकला आहे. दरम्यान, आज बांगलादेश संघ मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. मात्र, भारतीय संघाने कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली ज्या प्रकारे पहिला सामना जिंकला, त्यावरून बांगलादेश संघासाठी विजय मिळविणे मोठे आव्हान असणार आहे. वरिष्ठ खेळाडू विश्रांती घेत असून देखील पहिल्या लढतीत गाजविलेले वर्चस्व हे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये असलेली भारताची बेंच स्ट्रेंथ मजबूत असल्याचाही दिसून आले आहे.





