IND W vs SA W Final : भारताच्या लेकींनी रचला इतिहास! द. आफ्रिकेला धूळ चारत पहिल्यांदाच विश्वचषकावर कोरलं नाव

India Won 1st ICC Trophy Beating South Africa by 52 Runs : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने द.आफ्रिकेला ५२ धावांनी धूळ चारत पहिल्या आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. नवी मुंबईच्या डॉ. डीवाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने ५० षटकांत सात गडी बाद २९८ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ २४६ धावांवर गारद झाला. दीप्ती शर्माने चार विकेट्स घेत सामना फिरवला आणि दक्षिण आफ्रिकेची कर्णधार एल वोल्वार्डची शतकी खेळीवर पाणी फेरलं.
महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या ५२ वर्षांच्या इतिहासात भारताचे हे पहिले एकदिवसीय विश्वचषक विजेतेपद आहे. पहिला महिला एकदिवसीय विश्वचषक १९७३ मध्ये खेळला गेला होता. दीप्ती व्यतिरिक्त, शफाली वर्मानेही उत्कृष्ट कामगिरी केली. तिने फलंदाजीत ८७ धावा केल्या आणि दोन विकेट्स घेतल्या. तिच्या या अष्टपैलू कामगिरीला सामनावीर पुरस्कार देवून गौरवण्यात आले.
भारताची दमदार फलंदाज; शफाली-दीप्तीचे अर्धशतक
The leaders of a WORLD CUP WINNING TEAM 🫡❤️
Captain Harmanpreet Kaur and vice-captain Smriti Mandhana soaking it all in 🏆
Scorecard ▶ https://t.co/TIbbeE4ViO#TeamIndia | #WomenInBlue | #CWC25 | #INDvSA | #Champions | @ImHarmanpreet | @mandhana_smriti pic.twitter.com/MiniHNffb1
— BCCI Women (@BCCIWomen) November 2, 2025
पहिल्या फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाला शेफाली वर्मा आणि स्मृति मंधाना यांनी दमदार सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या विकेटसाठी १०४ धावांची भागीदारी केली. स्मृती मानधना ५८ चेंडूंत ४५ धावा करून बाद झाली. शफाली वर्माकडे या सामन्यात शतक ठोकण्याची सुवर्णसंधी होती, मात्र ती तिने गमावली. शफालीने ७८ चेंडूंत ८७ धावा फटकावल्या, ज्यात ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता.
उपांत्य फेरीत शतक ठोकलेली जेमिमा रॉड्रिग्स या सामन्यात फक्त ३७ चेंडूंत २४ धावाच करू शकल्या. कर्णधार हरमनप्रीत कौर २९ चेंडूंत २० धावा करून क्लीन बोल्ड झाली. अमनजोत कौरने १४ चेंडूंत १२, तर ऋचा घोषने ३४ धावा केल्या. दीप्ति शर्मा ५८ धावांवर रनआऊट झाली. दक्षिण आफ्रिकेच्या आयबोंगा खाकाने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या.
दीप्तीच्या पंजाची कमाल, वोल्वार्ड्टचे शतक ठरले व्यर्थ
लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचलाही चांगली सुरुवात मिळाली. तैजमिन ब्रिट्स आणि कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट यांनी पहिल्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. ब्रिट्स ३५ चेंडूंत २३ धावा करून बाद झाली. क्रमांक ३ वर फलंदाजीस उतरलेल्या एनेक बॉश खातेही उघडू शकल्या नाहीत. सुने लूसने ३५, तर सिनालो जाफ्टाने १६ धावा केल्या.
हेही वाचा – IND W vs SA W Final : अमनजोत कौरच्या अचूक थ्रोने फिरला सामना! ब्रिट्सच्या रनआऊटने भारताचे कमबॅक, पाहा VIDEO
दक्षिण आफ्रिकेचे इतर फलंदाज अपयशी ठरले, मात्र कर्णधार लॉरा वोल्वार्ड्टने अप्रतिम शतक ठोकले. लॉरा ९८ चेंडूंत ११ चौकार आणि १ षटकारासह १०१ धावा करून बाद झाली. अमनजोत कौरने तिचा शानदार झेल टिपला. गोलंदाजीमध्ये भारताच्या दीप्ती शर्माने सर्वाधिक ५ विकेट घेऊन सामना फिरवला.





