IND W vs SA W Final : दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! विश्वचषकाच्या एका हंगामात ‘हा’ खास पराक्रम करणारी जगातील पहिलीच खेळाडू

Deepti Sharma set World Record in IND W vs SA W Final : नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर महिला वनडे विश्वचषक २०२५ च्या फायनल सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २९८ धावा करून दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे लक्ष्य ठेवले. सलामीवीर शफाली वर्माने अर्धशतक झळकावले, तर मधल्या फळीत दीप्ती शर्माने शानदार खेळी करताना ५८ चेंडूंमध्ये ५८ धावा फटकावल्या. या खेळीच्या जोरावर तिने एका विश्वविक्रमाला गवसनी घातली आहे.
दीप्ती शर्माच्या नावे विश्वविक्रमाची झाली नोंद –
दीप्ती शर्माने या सामन्यातील ५८ धावांच्या खेळीदरम्यान एका विश्वचषक स्पर्धेत २०० पेक्षा जास्त धावा आणि १५ पेक्षा जास्त बळी घेणारी पहिली खेळाडू ठरली. यापूर्वी विश्वचषकाच्या एका आवृत्तीत कोणत्याही खेळाडूने हा विक्रम केला नव्हता. तसेच, नंबर ५ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना एका विश्वचषकात तीनवेळा ५० पेक्षा जास्त धावांची खेळी करणारी ती तिसरी फलंदाज ठरली. यापूर्वी हरमनप्रीत कौरने २०२२ मध्ये आणि अॅश्ले गार्डनरने २०२५ मध्येच हा पराक्रम केला होता.
शफाली-दीप्तीच्या अर्धशतकांची साथ –
5️⃣0️⃣ in the first match ✅
5️⃣0️⃣ in the #Final ✅𝘿𝙚𝙥𝙚𝙣𝙙𝙖𝙗𝙡𝙚 𝘿𝙚𝙚𝙥𝙩𝙞 at it again for #TeamIndia 💪
Her 18th fifty in Women’s ODIs 🙌
Updates ▶ https://t.co/TIbbeE4ViO#WomenInBlue | #CWC25 | #INDvSA | #Final | @Deepti_Sharma06 pic.twitter.com/YFeCWBclvn
— BCCI Women (@BCCIWomen) November 2, 2025
फायनलमध्ये दीप्ती शर्मा नंबर ५ वर फलंदाजीला उतरली. चौथ्या गड्यासाठी दीप्ती आणि हरमनप्रीत कौर यांच्यात ५२ धावांची अर्धशतकी भागीदारी झाली. त्यानंतर अमनजोत कौरसोबत २२ आणि ऋचा घोषसोबत ४७ धावांची भागीदारी केली. या भागीदारींच्या बळावर भारत ५० षटकांत २९८ धावांपर्यंत पोहोचला. भारताकडून शफाली वर्माने ८७, स्मृती मंधानाने ४५ धावा केल्या. शफाली शतकापासून अवघ्या १३ धावांनी दूर राहिली.
हेही वाचा – IND W vs SA W Final : अंपायरने दीप्ता शर्माला चुकीने आऊट देताच संतापला रोहित शर्मा, पाहा VIDEO
वनडे फॉरमॅटमध्ये दीप्ती शर्माची कामगिरी –
दीप्ती शर्माने २०१४ मध्ये दक्षिण आफ्रिकाविरुद्धच वनडे कारकीर्दीला सुरुवात केली होती. आतापर्यंत १२१ सामन्यांच्या १०३ डावांत ३७.०१ च्या सरासरीने २७३९ धावा केल्या असून त्यात १८ अर्धशतके आणि १ शतक आहे. गोलंदाजीमध्ये ११९ डावांत २७.९५ च्या सरासरीने १५७ बळी घेतले असून तिची सर्वोत्तम गोलंदाजीतील कामगिरी २० धावात ६ विकेट्स आहे.





