\n

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाने चांगली सुरुवात केली होती. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांच्यात चांगली भागीदारी बहरणाच इतक्यात सादिया इक्बालने भारतीय उपकर्णधारला तिचा बळी बनवले. या सामन्यात मंधाना केवळ सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. भारताला पहिला धक्का 18 धावसंख्येवर बसला. यानंतर जेमिमा हिने पदभार स्वीकारला. तिने शेफालीसोबत दुसऱ्या विकेटसाठी 43 धावांची भागीदारी केली. सलामीची फलंदाज शेफाली संघाची धावसंख्या 61 असताना 12व्या षटकात बाद झाली. तिला आलियानं ओमैमा सोहेलकरवी झेलबाद केले. शेफाली 35 चेंडूत 3 चौकाराच्या मदतीने 32 धावांची इनिंग खेळून बाद झाली. तर जेमिमाने 28 चेंडूत 23 धावा केल्या तर रिचा घोषला एकही धाव करता आली नाही.

\n

या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत सिंगने पाकिस्तानच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. मात्र, सामना जिंकण्यापूर्वीच ती दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट झाली. तिने 24 चेंडूत 29 धावांची दमदार खेळी खेळली आणि भारताला विजयाच्या जवळ नेले.  त्यानंतर दीप्ती शर्मा आणि सजीवन सजना अनुक्रमे सात आणि चार धावांची नाबाद खेळी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. अशा प्रकारे भारताने 18.5 षटकांत 4 बाद 108 धावा करत लक्ष्य गाठले.

\n

पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना कर्णधार फातिमा सनाने 4 षटकात 23 धावा देत 2 बळी घेतले. सादिया इक्बालने 4 षटकात 23 धावा देत 1 बळी घेतला. सोहेललाही एक यश मिळाले. तिने 3 षटकात 17 धावा दिल्या.

\n

तत्पूर्वी, टी-20 विश्वचषकातील महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 20 षटकांत 8 गडी गमावून 105 धावा केल्या. यादरम्यान पाकिस्तान संघाकडून निदा दारने सर्वाधिक धावा केल्या. तिच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 धावांची वैयक्तिक धावसंख्या गाठता आली नाही. पाकिस्तानकडून निदा दारने 34 चेंडूत सर्वाधिक 28 धावा केल्या. सलामीवीर मुनिबा अलीने 26 चेंडूत 17 धावांचे तर फातिमा सनाने 8 चेंडूत 13 योगदान दिले. सईदाने नाबाद 14 आणि नशराने नाबाद 6 धावा केल्या. गुल फिरोजा आणि तुबा हसन यांना खातेही उघडता आले नाही. या डावात पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या घरासारखी कोसळली.

\n

Women’s T20 World Cup 2024 (IND vs NZ) : न्यूझीलंडविरूध्द आम्ही सर्वोत्तम खेळ केला नाही – कर्णधार कौर

\n

\n

भारताच्या गोलंदाजीबदल बोलायचे झाले तर भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत पाकच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर फटकेबाजी करण्याची संधी दिली नाही. भारताकडून अरूधति रेड्डीने सर्वाधिक 3 बळी तर श्रेयंका पाटीलने 2 बळी घेतले. रेणुका सिंग ठाकूर, दीप्ती शर्मा आणि आशा शोभना यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. अरूधतीनं 4 षटकात 19, श्रेयंकानं 4 षटकात 12, रेणूकानं 4 षटकात 12, दीप्तीनं 4 षटकात 24 आणि शोभनानं 4 षटकात 24 धावा दिल्या.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियानं पुन्हा मारलं मैदान, पाकचा 6 विकेट्स राखून केला पराभव…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/10/w.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-w-vs-pak-w-live-india-beat-pakistan-by-six-wickets#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/10/w.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-w-vs-pak-w-live-india-beat-pakistan-by-six-wickets#webpage","name":"Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियानं पुन्हा मारलं मैदान, पाकचा 6 विकेट्स राखून केला पराभव…","url":"https://www.dainikprabhat.com/ind-w-vs-pak-w-live-india-beat-pakistan-by-six-wickets","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-w-vs-pak-w-live-india-beat-pakistan-by-six-wickets#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/10/w.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-w-vs-pak-w-live-india-beat-pakistan-by-six-wickets#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/ind-w-vs-pak-w-live-india-beat-pakistan-by-six-wickets","name":"Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियानं पुन्हा मारलं मैदान, पाकचा 6 विकेट्स राखून केला पराभव…"}}]}}}

Women’s T20 World Cup 2024 : टीम इंडियानं पुन्हा मारलं मैदान, पाकचा 6 विकेट्स राखून केला पराभव…