IND W vs AUS W : महिला क्रिकेटचा थरार १५ फेब्रुवारीपासून! ऑस्ट्रेलियाचा तगडा संघ जाहीर; सोफी मोलिन्युक्सकडे टी-२० चे नेतृत्व
IND W vs AUS W : २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी तयारीची मोठी संधी मानली जात आहे.

IND W vs AUS W Series 2026 : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांमधील हाय-व्होल्टेज क्रिकेट मालिकेला १५ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात उभय संघांमध्ये तीन टी-२०, तीन वनडे आणि एक ऐतिहासिक कसोटी सामना खेळवला जाणार आहे. २०२६ मध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी तयारीची मोठी संधी मानली जात आहे.
टी-२० मालिकेत नवा कर्णधार –
या दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने होईल. ऑस्ट्रेलियाने आपल्या टी-२० संघाच्या नेतृत्वाची धुरा सोफी मोलिन्युक्स हिच्याकडे सोपवली आहे. घरच्या मैदानावर खेळताना युवा खेळाडूंना ताकदीने आजमावण्याचा ऑस्ट्रेलियाचा मानस आहे.
ऑस्ट्रेलियन संघात मोठे फेरबदल –
सोफी मोलिनेक्स ऑस्ट्रेलिया महिला संघाची सर्व फॉरमॅटची कर्णधार
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, स्टार लेग स्पिनर अलाना किंगला टी-२० संघात स्थान मिळालेले नाही. ‘विमेन्स बिग बॅश लीग’मधील तिचा फॉर्म कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मात्र, तिची वनडे आणि कसोटी संघात निवड झाली आहे. अष्टपैलू निकोला कॅरीने २०२२ नंतर प्रथमच राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. १९ वर्षांची डावखुरी वेगवान गोलंदाज लूसी हॅमिल्टनला तिच्या प्रतिभेमुळे थेट कसोटी संघात स्थान मिळाले आहे.
The squads for the @nrmainsurance #AUSvIND Multi-Format Series are in.
DETAILS: https://t.co/ILgbFpHsdp pic.twitter.com/j07MdYL7pA
— cricket.com.au (@cricketcomau) January 28, 2026
भारताला मिळणार सरावाची संधी –
मुख्य मालिकेपूर्वी, १३ फेब्रुवारी रोजी भारतीय महिला संघ सिडनीमध्ये ‘गव्हर्नर-जनरल इलेव्हन’ विरुद्ध एक सराव टी-२० सामना खेळणार आहे. या संघात अलाना किंग आणि लूसी हॅमिल्टन यांचा समावेश असल्याने भारतीय फलंदाजांना ऑस्ट्रेलियन परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत होईल.
ऑस्ट्रेलिया महिला टी२० संघ : डार्सी ब्राउन, निकोला केरी, अॅशले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हॅरिस, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स (कर्णधार), बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शट, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेअरहॅम.
एकदिवसीय मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ : डार्सी ब्राउन, निकोला केरी, अॅशले गार्डनर, किम गार्थ, अॅलिसा हीली (कर्णधार), अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेअरहॅम.
ऑस्ट्रेलिया महिला कसोटी मालिकेसाठीचा संघ: डार्सी ब्राउन, अॅशले गार्डनर, किम गार्थ, लुसी हॅमिल्टन, अॅलिसा हीली (कर्णधार), अलाना किंग, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनेक्स, बेथ मूनी, एलिस पेरी, अॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया वॉल, जॉर्जिया वेअरहॅम.





