Washington Sundar : वर्ल्ड कपच्या १० दिवस आधी टीम इंडियाची धाकधूक वाढली! वॉशिंग्टन सुंदरच्या फिटनेसबाबत आली मोठी अपडेट
Washington Sundar : २६ वर्षीय वॉशिंग्टन सुंदरने २८ जानेवारी रोजी नेट्समध्ये सुमारे ३० मिनिटे फलंदाजी केली आहे.

Washington Sundar resumes training: टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा थरार ७ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. वर्ल्ड कपला आता अवघे काही दिवस शिल्लक असताना भारतीय संघाचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याच्या दुखापतीने निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाची झोप उडवली आहे. सुंदर सध्या बंगळुरू येथील ‘बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स’ (CoE) मध्ये फिट होण्यासाठी प्रयत्न करत आहे.
नेटमध्ये फलंदाजीला सुरुवात, पण वेदना कायम –
वृत्तानुसार, २६ वर्षीय वॉशिंग्टन सुंदरने २८ जानेवारी रोजी नेट्समध्ये सुमारे ३० मिनिटे फलंदाजी केली. दुखापतीनंतर त्याने पहिल्यांदाच बॅट हातात घेतली असली तरी, फलंदाजी करताना त्याच्या बरगड्यांच्या आसपास अजूनही वेदना जाणवत आहेत. ११ जानेवारी रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे सामन्यात गोलंदाजी करताना तो दुखापतग्रस्त झाला होता.
पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता –
७ फेब्रुवारी रोजी मुंबईत अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या भारताच्या पहिल्या वर्ल्ड कप सामन्यासाठी सुंदर पूर्णपणे फिट होण्याची शक्यता कमी असल्याचे वर्तवले जात आहे. मात्र, संघ व्यवस्थापनाने त्याच्या जागी घाईघाईने कोणताही बदल (Replacement) जाहीर न करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना संघात एक दर्जेदार ऑफ-स्पिनर हवा आहे, जो प्रतिस्पर्धी संघातील डाव्या हाताच्या फलंदाजांवर लगाम लावू शकेल.
🚨 UPDATE ON TEAM INDIA 🚨
– Washington Sundar has resumed batting practice at the BCCI CoE. 🏏
India is likely to play the waiting game, with over two weeks to go before the clash vs Pakistan. 🇮🇳🔥(TOI)#TeamIndia #WashingtonSundar #BCCI #CricketNews #INDvPAK #IndianCricket pic.twitter.com/rd3J01XnGg
— Akaran.A (@Akaran_1) January 28, 2026
रवी बिश्नोईचा पर्याय का निवडला?
दुखापतग्रस्त वॉशिग्टन सुंदरने सरावाला सुरुवात केली
सुंदर उपलब्ध नसल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत रवी बिश्नोईचा समावेश करण्यात आला आहे. बिश्नोईने यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. ऑफ-स्पिनर आणि बॉलिंग ऑलराउंडरचे पर्याय सध्या मर्यादित असल्याने संघ व्यवस्थापन सुंदरच्या कमबॅकची प्रतीक्षा करत आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर लक्ष –
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “पाकिस्तानविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यासाठी अजून १५ दिवसांहून अधिक काळ शिल्लक आहे. सुंदर अजूनही वर्ल्ड कप योजनेचा भाग आहे. जोपर्यंत तो पूर्णपणे बाहेर होत नाही, तोपर्यंत त्याच्या बदली खेळाडूचा विचार केला जाणार नाही.”
टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी भारतीय संघ:
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (विकेटकीपर).





