IND vs AUS : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेतील सामने कधी आणि कुठे लाइव्ह पाहता येणार? जाणून घ्या

IND vs AUS Live Streaming Details : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची रोमांचक एकदिवसीय मालिका रविवार, 19 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल झाला असून, सरावाला सुरुवात केली आहे. पहिला सामना पर्थ स्टेडियमवर होणार असून, यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि नवे वनडे कर्णधार शुबमन गिल यांच्यावर सर्वांचे लक्ष असेल. भारतीय संघाने अखेरचा वनडे सामना चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये खेळला होता. या मालिकेतील सामने कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घेऊया.
सामन्यांचे वेळापत्रक आणि प्रसारण –
या मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9:00 वाजता सुरू होईल, तर नाणेफेक 8:30 वाजता होईल. सामने स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर थेट पाहता येतील, तर जिओ हॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रिमिंग उपलब्ध असेल.
हेड-टू-हेड रेकॉर्ड –
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 152 एकदिवसीय सामने झाले आहेत. यात ऑस्ट्रेलियाने 84 सामने जिंकले, तर भारताने 58 सामने जिंकले. 10 सामने अनिर्णित राहिले. मात्र, गेल्या 10 सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियावर 6 वेळा मात केली आहे.
हेही वाचा – Ranji Trophy 2025 : अवघ्या १८ धावांवर निम्मा संघ गारद… एकाच गोलंदाजाने पाडला फडशा! जाणून घ्या कोण आहे?
भारताचा ऑस्ट्रेलियातीले कसा आहे रेकॉर्ड?
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर ५४ एकदिवसीय सामने खेळण्याचा रेकॉर्ड आहे, त्यापैकी फक्त १४ जिंकले, ३८ पराभव झाले आणि दोन सामने अनिर्णीत राहिले. त्यामुळे, भारतीय संघ हा रेकॉर्ड सुधारण्याचा प्रयत्न करेल, जो नवीन एकदिवसीय कर्णधार शुबमन गिलसाठी एक महत्त्वाचे आव्हान असेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ:
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).





