Jemimah Rodrigues : ‘मी या दौऱ्यात रोज रडायची…’, ऐतिहासिक विजयानंतर जेमिमाचा मोठा खुलासा, नेमकं काय होतं कारण?

Jemimah Rodrigues Reaction : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सनी पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली. या ऐतिहासिक विजयाचे श्रेय जेमिमा रॉड्रिग्सच्या नाबाद १२७ धावांच्या दमदार खेळीला जाते. मात्र, सामन्यानंतर मैदानावर उमटलेला तिचा भावुक क्षण आई-वडिलांना आनंदाश्रूंसह मारलेली मिठी हे देखील कायम स्मरणात राहील. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ३३९ धावांचे विशाल लक्ष्य उभारले होते. भारताने हे लक्ष्य यशस्वीरीत्या पूर्ण करताना जेमिमाने १३४ चेंडूंमध्ये नाबाद १२७ धावा फटकारल्या. तिच्या या खेळीमुळे तिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. धावांचा पाठलाग पूर्ण होताच जेमिमा मैदानावर गुडघे टेकून बसली आणि आकाशाकडे पाहात कृतज्ञता व्यक्त केली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
#INDvsAUS #CWC25 #jemimahrodrigues post match interview 🙏. Struggle and Faith . This is what India is all about. pic.twitter.com/3lpj6tTiyI
— Biju (@bijujohnson) October 31, 2025
मागच्या विश्वचषकात मला संघातून वगळण्यात आले होते –
सामन्यानंतर जेमिमाने मानसिक तणावाचा मोठा खुलासा केला. ती म्हणाली, “मागच्या विश्वचषकात मला संघातून वगळण्यात आले होते. यावेळी मी संघात आले आणि फॉर्ममध्ये होते, पण एकामागून एक घटना घडत होत्या. मी काहीही नियंत्रित करू शकत नव्हते.
हेही वाचा – IND vs AUS : …अखेर भारताच्या विजयरथाला लागला ब्रेक! मेलबर्नमध्ये १७ वर्षांनंतर पहिल्यांदाच घडलं असं
माझ्याभोवती विश्वास ठेवणारे उत्तम लोक होते. या संपूर्ण दौऱ्यात मी जवळजवळ दररोज रडत होते. मानसिकदृष्ट्या मी बरी नव्हते, खूप काळजीत होते. संघातून वगळले जाणे हे मोठे आव्हान होते. पण मला फक्त खेळपट्टीवर उभे राहायचे होते आणि देवाने बाकीची काळजी घेतली.”
हेही वाचा – IND vs AUS : मिचेल मार्शची खेळी अभिषेकच्या अर्धशतकावर पडली भारी! ऑस्ट्रेलियाने भारताचा उडवला धुव्वा
जेमिमाने पुढे सांगितले, “शेवटच्या क्षणापर्यंत मी बायबलमधील एक वचन मनात उच्चारत होते – शांत उभे राहा आणि देव माझ्यासाठी लढेल. मी फक्त उभी राहिले आणि त्याने माझ्यासाठी लढा दिला. मी येशूचे, आई-वडिलांचे आणि प्रशिक्षकांचे आभार मानते. हे स्वप्नवत वाटते, अजूनही यावर विश्वास बसत नाही.”





