IND vs WI 4th T20I : वेस्ट इंडिजचा भारतावर दणदणीत विजय; शाई होपच्या शतकापुढे संजूचे वादळी खेळी व्यर्थ, मालिकेत साधली बरोबरी
IND vs WI : या विजयामुळे वेस्ट इंडिजने पाच सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत आणली आहे. बंगळूरु येथे होणारा आगामी सामना मालिका विजेता निश्चित करेल. वेस्ट इंडिजने टी-२० मालिकेत कडवी झुंज दिली आहे.

IND vs WI West Indies Beat India by 24 Runs in 4th T20 Series Levelled 2-2 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात विंडीजने भारताचा २४ धावांनी पराभव केला. या विजयासह पाहुण्या वेस्ट इंडिज संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधत मालिकेतील चुरस शिगेला पोहोचवली आहे. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार शाई होपच्या शतकी तडाख्याच्या जोरावर २० षटकांत ३ बाद २४७ धावांचा डोंगर उभारला होता. आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ १९.४ षटकांत २२३ धावांपर्यंतच मजल मारू शकला. अखेरच्या चेंडूंवर अर्शदीप सिंग दुखापतग्रस्त झाल्याने सामना दोन चेंडू शिल्लक असतानाच संपला.
संजू सॅमसनचे २३ चेंडूंत ५६ धावांचे वादळ; अभिषेक मात्र शांत –
विजयासाठी आवश्यक असलेल्या २४८ धावांच्या ऐतिहासिक आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर संजू सॅमसनने अवघ्या २० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याने २३ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ५६ धावा कुटल्या आणि अवघ्या ३ षटकांत भारताचे अर्धशतक फलकावर लावले. मात्र पाचव्या षटकात संजू बाद झाल्यानंतर भारताची गती मंदावली. दुसऱ्या टोकाला अभिषेक शर्मा चाचपडताना दिसला आणि त्याने २४ चेंडूंत केवळ २९ धावा केल्या.
तिलक-नितीशची ७० धावांची झुंज; अखेरच्या क्षणी डाव घसरला
West Indies level the series 2-2.
An important decider awaits in Bengaluru on Saturday.
Scorecard ▶️ https://t.co/ksuQbTW6n5
#TeamIndia | #INDvWI | @mflone_ https://t.co/i7juMPuEe9
— BCCI (@BCCI) October 14, 2026
११.४ षटकांत अवघ्या १३० धावांवर भारताचे ५ प्रमुख फलंदाज तंबूत परतल्याने पराभव अटळ दिसत होता. अशा बिकट स्थितीत तिलक वर्मा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रतिहल्ला चढवत ३२ चेंडूंत ७० धावांची दमदार भागीदारी रचली आणि सामन्यात रंगत आणली. मात्र मोक्याच्या क्षणी दोघेही बाद झाल्याने भारताच्या हातून सामना निसटला. अखेरीस सर्वाधिक ५ विकेट्स घेणाऱ्या कीमो पॉलचा चेंडू खांद्यावर लागल्याने अर्शदीप सिंग रिटायर्ड हर्ट झाला आणि भारताचा डाव २२३ धावांवर संपला.
शाई होपचे नाबाद १०२ धावांचे तांडव; रदरफोर्डची फटकेबाजी –
West Indies deliver a clinical performance to level the T20I series 2-2 against India and set up a decider in Bengaluru 👊
📝: https://t.co/WixfTzusOa https://t.co/PvS7eCgKs6
— ICC (@ICC) October 14, 2026
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना विंडीजचा कर्णधार शाई होपने पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. होपने ५० चेंडूंत ९ षटकार व ४ चौकारांसह नाबाद १०२ धावा ठोकल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील त्याचे हे तिसरे शतक ठरले. त्याला शेरफेन रदरफोर्डने २६ चेंडूंत नाबाद ४९ धावा, हेटमायरने १२ चेंडूंत ३३ आणि रोव्हमन पॉवेलने २४ धावा करत भक्कम साथ दिली.
निष्प्रभ भारतीय गोलंदाजी; प्रिन्स यादव वगळता सर्वच महागडे
या हायव्होल्टेज सामन्यात भारतीय गोलंदाजांची दाणादाण उडाली. चार षटकांत ३६ धावा देऊन एक विकेट्स घेणारा प्रिन्स यादव सर्वात चांगला गोलंदाज ठरला, तर इतर सर्वच गोलंदाजांची इकॉनॉमी ११ च्या वर राहिली. अर्शदीप आणि अक्षर पटेलला प्रत्येकी एक विकेट्स मिळाली, तर नमन धीरने एका षटकात तब्बल १९ धावा दिल्या. आता मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना निर्णायक ठरणार आहे.





