IND vs WI : ध्रुव जुरेलने ठोकले पहिले कसोटी शतक! वेस्ट इंडिजविरुद्ध अशी कामगिरी करणारा ठरला पाचवा भारतीय

Dhruv Jurel maiden century in IND vs WI 1st Test : भारतीय क्रिकेट संघातील युवा यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने वेस्ट इंडिजविरुद्ध नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोची सामन्यात आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत संधी मिळालेल्या जुरेलने ही संधी साधताना 190 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह शतक पूर्ण केले. या शतकासह तो भारतासाठी कसोटी शतक ठोकणारा 12 वा यष्टीरक्षक-फलंदाज ठरला.
ध्रुव जुरेलचे पहिले कसोटी शतक –
भारत-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जुरेलने ही कामगिरी केली. दुसऱ्या सत्रात भारतीय कर्णधार शुबमन गिल बाद झाल्यावर जुरेल फलंदाजीसाठी मैदानात उतरला. यावेळी त्याने प्रथम केएल राहुलला शतक पूर्ण करताना पाहिले आणि नंतर स्वत: शतक झळकावले. जुरेलने तिसऱ्या सत्रात चौकारासह आपले शतक पूर्ण केले. त्याची ही खेळी 125 धावांवर संपली, ज्यामध्ये 15 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.
पाचवा भारतीय फलंदाज ठरला –
That’s Stumps on Day 2!
1⃣0⃣0⃣s from KL Rahul, Dhruv Jurel, and Ravindra Jadeja ✅#TeamIndia with a massive lead of 286 runs 💪
Scorecard ▶️ https://t.co/MNXdZceTab#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/cyPiBC6V4I
— BCCI (@BCCI) October 3, 2025
विशेष म्हणजे, त्याला बाद करणारा वेस्टइंडिजचा डावखुरा फिरकी गोलंदाज खारी पियरे हा 34 व्या वर्षी कसोटी पदार्पण करत होता आणि जुरेल त्याचा पहिला बळी ठरला.जुरेल भारताचा असा पाचवा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला, ज्याने आपल्या टेस्ट कारकिर्दीतील पहिले शतक वेस्ट इंडिजविरुद्ध नोंदवले. यापूर्वी विजय मांजरेकर, फारुख इंजिनियर, अजय रात्रा आणि ऋद्धिमान साहा यांनीही वेस्टइंडीजविरुद्ध आपले पहिले कसोटी शतक ठोकले होते. जुरेलच्या या खेळीमुळे त्याने संधीचा पुरेपूर फायदा घेत आपले स्थान भारतीय संघात अधिक मजबूत केले आहे.
१२ वा यष्टीरक्षक फलंदाज ठरला –
जुरेल भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात, 12 वा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला आहे, ज्याने या फॉरमॅटमध्ये यष्टीरक्षक म्हणून शतकं झळकावण्याचा पराक्रम केला आहे. भारताने दुसऱ्या दिवसअखेर 5 बाद 448 धावा केल्या असून 286 धावांची आघाडी घेतली आहे. वॉशिंग्टन सुंदर 9 आणि रवींद्र जडेजा 104 धावांवर नाबाद आहे.





